शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अध्यात्माच्या ताकदीवरच भारत पुन्हा विश्वगुरू होणार; सय्यद सलमान चिश्ती अजमेर शरीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 1970 5:30 AM

Nagpur News देशाला पुन्हा एकदा आपल्या अध्यात्माची ताकद निर्माण करावी लागेल. या अध्यात्माच्या ताकदीवरच भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, जगाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

नागपूर : भारत हा विश्वगुरू होता, तो केवळ आपल्या अध्यात्माच्या ताकदीवरच. आजच्या काळात खऱ्या अर्थाने अध्यात्माची गरज आहे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा आपल्या अध्यात्माची ताकद निर्माण करावी लागेल. या अध्यात्माच्या ताकदीवरच भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, जगाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. (India will become a world leader again only on the strength of spirituality; Syed Salman Chishti Ajmer Sharif)

लोकमततर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेसाठी ते नागपुरात आले असता लोकमतशी चर्चा करीत होते. हाजी सय्यद सलमान चिश्ती यांचे कुटुंबीय गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ दर्गाची सेवा करीत आहेत. सध्या सेवा करणारी त्यांची पिढी ही २६ वी आहे. गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ येथे दररोज हजारो लोकांना लंगर सेवा पुरवली जाते. यात सर्वधर्मीयांचा समावेश असल्याने शुद्ध शाकाहारी जेवण तयार केले जाते. कोविडकाळातही लोकांची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यात आली. यासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातही काम केले जाते.

यावेळी हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले, आजवर मी अनेक धार्मिक परिषदा पाहिल्या. त्यात सहभागीसुद्धा झालो. परंतु, देशातील एक प्रमुख मीडिया हाउस असलेल्या लोकमतने आयोजित केलेली ही आंतरधर्मीय परिषद अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण, आज अशा परिषदांची खऱ्या अर्थाने गरज आहे. तेव्हा इतर मीडिया हाउसेसनेही यातून शिकण्याची गरज आहे.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदLokmat Eventलोकमत इव्हेंट