भारत-ऑस्ट्रेलिया वन डे; माहीचा चाहता मैदानात शिरतो तेव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:19 IST2019-03-05T18:13:52+5:302019-03-05T18:19:47+5:30

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील नागपुरात सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात जामठा स्टेडियमवर धोनीच्या एका चाहत्याने मैदानात प्रवेश करून माहीच्या कंबरेला मिठी मारून मैदानातील हजारो प्रेक्षकांना अचंबित केले.

India-Australia One Day; When a fan enters the field ... | भारत-ऑस्ट्रेलिया वन डे; माहीचा चाहता मैदानात शिरतो तेव्हा ...

छाया: विशाल महाकाळकर

ठळक मुद्देखेळाची इनिंग सुरू झाली तेव्हा घडली घटना

विशाल महाकाळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील नागपुरात सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात जामठा स्टेडियमवर धोनीच्या एका चाहत्याने मैदानात प्रवेश करून माहीच्या कंबरेला मिठी मारून मैदानातील हजारो प्रेक्षकांना अचंबित केले.
भारताने आपली फलंदाजी सुरू केली तेव्हा माहीच्या एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून मैदानात धाव घेतली. सगळ््या खेळाडूंच्या गराड्यातून वाट काढत त्याने माहीला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. मग धोनीनेही त्याच्याशी थोडी मस्ती करून त्याचे समाधान केले. तोपर्यंत सुरक्षा रक्षक मैदानात पोहचले होते आणि त्याने या उत्साही चाहत्याला पुन्हा प्रेक्षकांत नेऊन सोडले. विशेष म्हणजे या युवकाने धोनीच्याच क्रमांकाचा, ७ नंबरचा टी शर्ट परिधान केला होता. 

Web Title: India-Australia One Day; When a fan enters the field ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.