शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

राज्यातील स्वतंत्र महिला पोलीस कक्ष झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:57 AM

२०१२ मध्ये पोलीस महासंचालकांनी परिपत्रक काढून प्रत्येक ठाण्यात महिला पोलीस कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या वेबसाईटवर ९७५ महिला पोलीस कक्ष स्थापन असल्याची आकडेवारी आहे.

ठळक मुद्देविभागाच्या वेबसाईटवर ९७५पोलीस मुख्यालयात माहितीच संकलित नाही

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१६ च्या अहवालानुसार महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत घडलेल्या गुन्ह्यांची टक्केवारी ५४.६ टक्के आहे तर महिलांच्या बाबतीत प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांची संख्या ४९१८३ आहे. २०१२ मध्ये पोलीस महासंचालकांनी परिपत्रक काढून प्रत्येक ठाण्यात महिला पोलीस कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या वेबसाईटवर ९७५ महिला पोलीस कक्ष स्थापन असल्याची आकडेवारी आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यात पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कक्ष बेपत्ता झाल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते.देशातील २४ राज्य व २ केंद्रशासित प्रदेशात ६२२ पेक्षा जास्त स्वतंत्र महिला पोलीस ठाणे असल्याचे पोलीस अनुसंधान व विकास ब्युरोच्या आकडेवारीवरून दिसून येते. यात महाराष्ट्राचा समावेश नाही. महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक कमिटी स्थापन केली होती. या समितीने प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कक्ष स्थापन करण्यासंदर्भात शिफारशी दिल्या होत्या. त्या शिफारशीची दखल घेत २०१२ मध्ये पोलीस महासंचालकांनी एक परिपत्रक काढून प्रत्येक पोलीस ठाण्यात एक महिला पोलीस कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची आखणीही करण्यात आली होती. बेटीया बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने महाराष्ट्रात किती महिला पोलीस कक्ष अस्तित्वात आहे याची प्रत्यक्ष आणि माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये स्वत: पाहणी केली. पोलीस ठाण्यातूनसुद्धा माहिती मागविली. त्याचबरोबर न्यायालयात महिला पोलीस ठाण्याच्या संदर्भात याचिकासुद्धा दाखल केली. पण यापूर्वीच यासंदर्भातील एका याचिक ा न्यायालयात दाखल होती. त्यात सरकारने दिलेल्या शपथपत्रात १०४९ महिला पोलीस कक्ष स्थापन केल्याचा उल्लेख होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याने याचिका खारीज करण्यात आली.

ठाण्यातून वेगळी व उपअधीक्षक कार्यालयातून वेगळीच माहितीबुलडाणा जिल्ह्यातील २७ पोलीस ठाण्यातून कक्षाच्या संदर्भात माहिती मागितली. पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीवरून महिला पोलीस कक्ष नसल्याचे स्पष्ट केले. उपअधीक्षकांनी दिलेल्या माहितीत पोलीस स्टेशन आहे, असे सांगून महिला पोलीस कक्षाचा एडिटिंग करून फोटो पाठविला.पुन्हा संस्थेने २०१८ मध्ये काही पोलीस स्टेशनकडून महिलांच्या संदर्भात घडलेल्या गुन्ह्याच्या तपास केलेल्या अधिकाऱ्यांची नावे मागितली. यात एकाही गुन्ह्याचा तपास महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला नसल्याचे दिसून आले. मात्र पोलीस उपअधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहिती प्रत्येक महिला पोलीस कक्षात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती दाखविली.

संस्थेने घेतला महिला पोलीस कक्षाचा शोधसंस्थेने पोलीस मुख्यालयातील जन माहिती अधिकाऱ्यांना पोलीस कक्षासंदर्भातील माहिती मागितली. एकीकडे शपथपत्रात १०४९, विभागाच्या वेबसाईटवर ९७५ कक्ष असल्याचा उल्लेख असताना, जनमाहिती अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीत महिला पोलीस कक्षाची माहिती संकलित नसल्याचे कळविले. संस्थेने २० जिल्ह्यातील २५० पोलीस ठाण्यातून माहिती मिळविली. त्यातही संभ्रमावस्था आहे.

सरकारने शोध घ्यावाअत्याचारीत महिलांना स्वतंत्र महिला पोलीस कक्ष नसल्याने योग्य न्याय मिळत नाही. प्रलंबित प्रकरणे आणि गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता, महिला पोलीस कक्षाची गरज आहे. विभागाने दिलेल्या शपथपत्रात व वेबसाईटवर महिला पोलीस कक्ष आहे. प्रत्यक्षात हे कक्ष गायब झाले आहे. त्यामुळे सरकारने स्वतंत्र महिला पोलीस कक्षाचा शोध घ्यावा, यासंदर्भात संस्थेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

टॅग्स :Policeपोलिस