स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास अशक्यच!
By Admin | Updated: July 21, 2014 22:26 IST2014-07-21T22:26:51+5:302014-07-21T22:26:51+5:30
चंद्रकांत वानखडे यांचे मत : ‘रेल देखो, बस देखो’ अभिनव आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन

स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास अशक्यच!
मंगरूळपीर : स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर अमरावती, नागपूर, चंद्रपुर व यवतमाळ येथे झालेल्या जनमत चाचणीतून वेगळ्या विदर्भाची जनभावना स्पष्ट झाली. हीच भावना आंदोलनाद्वारे प्रकट व्हावी या अनुषंगाने ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण विदर्भात ह्यरेल देखो, बस देखो आंदोलनह्ण करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी उत्स्फुर्त व्हावे, कारण स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकास नाही असे मत ज्येष्ठ नेते शेतकरी चळवळीचे अभ्यासक चन्द्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले.
ह्यजनमंच लढा विदर्भाचाह्ण या संघटनेद्वारे १८ जुलै रोजी कारंजा येथील महेश भवन व मंगरूळपीर येथील राष्ट्रीय विद्या निकेतनमध्ये पार पडलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. ह्यरेल देखो, बस देखो आंदोलनह्ण आंदोलनाच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यापासून ते नागपुर जिल्ह्यापर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु आहे. कारंजा व मंगरूळपीर येथे झालेल्या बैठकीला जनमंच समिती अध्यक्ष अँड. अनिल किलोर, प्रकाश इटनकर, जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, अंबादास डोईफोडे, महम्मद मुन्नीवाले, डॉ.दिवाकर इंगोले, जि.प.सदस्या बेबीताई चव्हाण, प्रा.शरद पाटील नागपूर, प्रमोद पांडे, मनोहर खोरगडे, डॉ.गजानन झाडे, प्रकाश इटनकर, राजीव जगताप आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना वानखडे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये १९९७ ला भुवनेश्वरच्या पक्ष अधिवेशनात स्वंतत्र विदर्भ राज्याचा ठराव घेण्यात आला होता. आता तेच सरकार असल्याने वेगळ्या विदर्भाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विदर्भातील आत्महत्येचा प्रश्न देशभरात गाजला त्याविषयी पि.साईनाथ यांनी लिखान केले. त्याची दखल घेत पंतप्रधान, कृषी मंत्री दौर्यावर आले होते. त्यावेळी १ हजार ७५ कोटीचे पॅकेज विदर्भाला दिले पण कापसाला दिला जाणारा बोनस रद्द केला असा अन्याय विदर्भावर नेहमीच होतो. दांडेकर समितीमध्ये १९९४ मध्ये अनुशेष २0१२ ला संपला त्यानंतर अनुशेष काढलाच नाही. २00६ मध्ये सत्यशोधन समिती आली होती. त्यांनी २२५ पानांचा अहवाल दिला. त्यामधील शेवटच्या पानाचा निष्कर्ष असा होता की, विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भाला निधी दिला जात नाही दिला तर खर्च करता येत नाही असा तो निधी असतो. विदर्भाचा विकास साधण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय विकास नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट क्रांतीदिनी स्वतंत्र विदर्भ राज्य निमिर्तीसाठी ह्यरेल देखो बस देखो आंदोलनह्ण करण्यात येत आहे. या प्रसंगी गजानन अमदाबादकर, डॉ निलेश हेडा, पवन मिश्रा, राजाभाऊ चव्हाण, शेषराव ढोके, ओमप्रकाश तापडीया, बंडूभाऊ इंगोले व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश इटनकर, प्रमोद पांडे, किशोर गुर्हाने, राम आखरे, टी.बी.जगताप, श्रीकांत दोड, भगवानदास राठी, हसमुखभाई पटेल, विनोद बोरकुटे यांनी केले आहे.
९ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर येथे होणार्या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुभाष हातोलकर यांच्याकडे सोपविण्यात आली.
सभेला सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई हातोलकर, प्रा.अरूणभाऊ इंगळे, केंद्रप्रमुख अरूणभाऊ पंडित, सतिश बन्नोरे, मृण्मयी हातोलकर, शकातुल्लाखाँ, डॉ.विकल पंडित, प्राचार्य मनोहर बनसोड, राजेन्द्र बोरकर, प्रा.देविदास भगत, आकाश शेळके, ऋषिकेश गडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष हातोलकर व अनिल लोहकपुरे यांनी केले. आभार पवन मिश्रा यांनी मानले.