सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये स्वातंत्र्यदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST2021-08-17T04:13:38+5:302021-08-17T04:13:38+5:30
कोराडी : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहाेत्सवानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था ...

सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये स्वातंत्र्यदिन
कोराडी : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहाेत्सवानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सभासद डॉ. बबनराव चौधरी तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर उपस्थित होते. यावेळी शाळा निरीक्षक चोबितकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सांगोले, चौधरी व प्रभारी मुख्याध्यापिका राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.....
सरस्वती इन्स्टिट्यूट, काेराडी
कोराडी : येथील रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट ॲण्ड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शोभणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विभागप्रमुख स्नेहल ताजने, मुख्याध्यापिका कॅरेन यंगड, सरस्वती भवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स, संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ, संस्थेचे सचिव डॉ. मारोती वाघ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीक्षा जनबादे तर आभार प्रा. विजय वनकर यांनी मानले.