जनसंग्रामतर्फे स्वातंत्र्यदिनी रॅली
By Admin | Updated: August 17, 2014 00:49 IST2014-08-17T00:49:16+5:302014-08-17T00:49:16+5:30
जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या माध्यमातून फुटाळा तलाव येथून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भव्य ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

जनसंग्रामतर्फे स्वातंत्र्यदिनी रॅली
परिणय फुके यांचे आयोजन : देशभक्तांचे केले स्मरण
नागपूर : जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या माध्यमातून फुटाळा तलाव येथून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भव्य ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये शहरातील कानाकोपऱ्यातील हजारो युवक-युवती सामील झाले होते़
रॅलीची सुरुवात फुटाळा तलाव येथून सकाळी १० वाजता करण्यात आली होती़ रॅलीच्या सुरुवातीला डॉ़ परिणय फुके म्हणाले की, युवकांनो या देशाची प्रगती, उन्नती व भविष्य आता तुमच्या हातात आहे; कारण आज आपल्या देशात तरुण युवक-युवतींचे मोठे प्रमाण असल्याने आपला देश हा तरुण देश म्हणून जगात ओळखल्या जात आहे़ आपल्या देशाला योग्य दिशेने नेऊन जगात सर्वगुणसंपन्न करायचे आहे. या देशाकडे कुणी बोट दाखविले तर आपल्या देशातील तरुण पिढी त्वरित जागी झाली पाहिजे़
फुटाळा तलाव येथून रॅलीची सुरुवात होऊन शहरातील विविध विभागात गेली. युवकांचे देशासाठी किती महत्त्व आहे, हे पथनाट्याच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. रॅली ही अंबाझरी, शंकरनगर चौक, रामनगर चौक, ट्रॅफिक पार्क, धरमपेठ सुदामा टॉकीज, रविनगर, छावणी चौक, पूनम चेंबर, कल्पना टॉकीज चौक, मानकापूर, बोरगाव, गिट्टीखदान, फ्रेंडस कॉलनी, हजारीपहाड, वायुसेनानगर आदी मार्गाने रॅली जाऊन सायंकाळी फुटाळा तलाव येथे समारोप झाला.
या रॅलीचे आयोजक डॉ़ परिणय फुके यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर, सैनिकांचा संदेश आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे स्पष्ट केले.
या रॅलीच्या आयोजनाकरिता दीपक बानिया, राम कुकडे, विनोद पारवे, राजू पुसदकर, रॉबिन वांधे, सचिन डोये, आशिष मनकवडे, चंचल निमसडे, शेखर मनकवडे, मनोज मडावी, रामभाऊ कळंबे, अभिलाष धानोरकर, नामदेव ढोक, विजय चिकने, विजू डोंगरे, रणजित सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)