शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

खरेच, पिक्चर अभी बाकी है... नरवणे यांच्या वक्तव्याला निवृत्त एअर मार्शल विभास पांडेंचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:07 IST

Nagpur : फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' पासून सावधान

फहीम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. यावर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ट्रीट करीत, 'पिक्चर अभी बाकी है', असे म्हटले आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल विभास पांडे यांनीही याला दुजोरा देत खरोखरच 'पिक्चर अभी बाकी है' असे म्हटले आहे. 

निवृत्त एअर मार्शल विभास पांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना, पाकिस्तानने भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर भारतीय सैन्याकडून असे आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे, असे संकेत दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या १०० किमी आत घुसून बहावलपूरला लक्ष्य केले आहे. जर पाकिस्तानने प्रत्युत्तराच्या नावाखाली काही केले तर भारतीय सैन्यात आणखी खोलवर घुसण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला आणखी वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते. 

फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' पासून सावधानएअर मार्शल विभास पांडे यांनी, आजच्या युद्धासारख्या परिस्थितीत प्रत्येकाने 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' ची वाईट सवय सोडून देण्याचे आवाहन केले. पाकिस्तानला सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे युद्ध लढत राहू द्या. त्यामुळे, कोणतीही पोस्ट किंवा संदेश त्वरित फॉरवर्ड करण्याची सवय प्रत्येकाने टाळणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, भारताच्या हिताचे नसलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करणे सर्वांसाठी चांगले राहील.

चर्चा मॉक ड्रिलची आणि निकाल लावलाविभास पांडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरात २५९ ठिकाणी मॉक ड्रिलची घोषणा केली होती. सर्वजण याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र अचानक पहाटे पाकिस्तानात ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याची बातमी धडकली. त्यावरून 'चर्चा चाचणीची होती आणि हाती निकाल दिला' असे झाले आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान लाऊडस्पीकर लावून नागरिकांना जागरूक करत असे. आता ती परिस्थिती नाही. सोशल मीडियाचे शक्तिशाली माध्यम उपलब्ध आहे. मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहावे.

 

टॅग्स :nagpurनागपूरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान