वाढत्या चेन स्नॅचिंगमुळे हौस झाली जीवघेणी

By Admin | Updated: May 14, 2014 00:46 IST2014-05-14T00:46:23+5:302014-05-14T00:46:23+5:30

नागपूर : चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे दागिने घालने जीवघेणे झाले आहे. एकेक पैसा गोळा करून मोठय़ा हौसेने खरेदी केलेले दागिने घालून बाहेर पडावे आणि एखाद्या

Increasing chain snuffed up an animosity | वाढत्या चेन स्नॅचिंगमुळे हौस झाली जीवघेणी

वाढत्या चेन स्नॅचिंगमुळे हौस झाली जीवघेणी

नागपूर : चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे दागिने घालने जीवघेणे झाले आहे. एकेक पैसा गोळा करून मोठय़ा हौसेने खरेदी केलेले दागिने घालून बाहेर पडावे आणि एखाद्या भामट्याने त्यावर हात मारून स्वप्नांचा चुराडा करावा, असा प्रकार केव्हाही, कुठेही व कोणासोबतही घडू शकतो. यामुळे दागिने घालणार्‍यांनी पावलोपावली सावध राहण्याची गरज आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. हेच संधीचे दिवस आहेत म्हणून सराईत गुन्हेगारही अनेकांच्या मागावर आहेत. त्यामुळे तुम्हीच दक्ष राहा, काळजी घ्या.

वाढत्या गुन्हेगारीमुळे आजच्या काळात मानवी जीवन असुरक्षित झाले आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत कोणीही आपल्या जीवाची वा संपत्तीच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. नागपुरातील गेल्या काही महिन्यातील घटना पाहता चेन स्नॅचिंग गंभीर समस्या झाल्याचे स्पष्ट होते.

चेन स्नॅचिंगसाठी वेगवान दुचाक्या वापरल्या जातात. यामुळे घटना घडली त्याचवेळी चोरट्यांना पकडणे शक्य होत नाही. काही कळायच्या आतच ते नजरेआड होतात. चेन स्नॅचिंग कधी-कधी दागिन्यांवर निभावते, पण कधी जीवावरही बेतते. यामुळे महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना सावधानी बाळगणे अवश्यक आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Increasing chain snuffed up an animosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.