शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत वाढला गाड्यांचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:32 IST

प्रवाशांना अधिक जलद गतीने पोहचता यावे यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अलीकडेच केलेल्या एका चाचणीत रेल्वेगाडीने नियोजित अंतर १३० किलोमीटर प्रति तास या गतीने एक तास कमी वेळात कापले.

ठळक मुद्दे१३० किलोमीटर प्रति तास चाचणी झाली यशस्वी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रवाशांना अधिक जलद गतीने पोहचता यावे यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अलीकडेच केलेल्या एका चाचणीत रेल्वेगाडीने नियोजित अंतर १३० किलोमीटर प्रति तास या गतीने एक तास कमी वेळात कापले.दपूमरेच्या नागपूर विभागातर्फे विविध मार्गांवर गाड्यांचा वेग नेहमीच तपासला जातो. प्रवासी गाड्यांचा वेग वाढविण्यावर विशेष भर दिला जातो. त्यासाठी रुळांची नियमित देखभाल आणि वेगाची चाचणी घ्यावी लागते. डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात अलीकडेच २४ एलएचबी कोच असलेल्या गाडीच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. नागपूर ते दुर्ग या मार्गावर ही गाडी चालविण्यात आली. यावेळी प्रति तास १३० किलोमीटर या वेगाने ही गाडी यशस्विपणे चालविण्यात आली. यात १ तासाची बचत झाली. एलएचबी प्रकारचे २४ कोच असलेल्या गाडीची ही पहिलीच चाचणी होती. व्ही.के. वर्मा या गाडीचे लोकोपायलट, तर सह लोकोपायलट मो. इलियास होते. गार्ड पी.व्ही. रमन होते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे फक्त विशेष गाड्या धावत आहेत. दपूमरे या लॉकडाऊनचा उपयोग संधी म्हणून करीत आहेत. अलीकडेच शेषनाग ही विशाल मालगाडी नागपूर विभागातर्फे चालविण्यात आली होती. या गाडीची लांबी ३ किलोमीटर होती. असे अनेक प्रयोग दपूमरेच्या नागपूर विभागातर्फे केले जात आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे