शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी बूस्टर औषधांचे साईड इफेक्ट वाढले; डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 09:12 IST

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सोशल मीडिया व व्हॉट्सअ­ॅपवर तर हाच काढा किंवा हीच औषधे परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक औषधे बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या कहराची भीती घराघरात आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोना होत नाही किंवा झाला तरी तो लवकर बरा होऊ शकतो, असा काहीसा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. याचा फायदा घेत काही कंपन्यांनी आयुर्वेदिक व अ­ॅलोपॅथी औषधे बाजारात आाणली आहेत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधे घेणाऱ्यांना त्रासदायक साईड इफेक्टला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सोशल मीडिया व व्हॉट्सअ­ॅपवर तर हाच काढा किंवा हीच औषधे परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांसोबतच प्रत्येकाने रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दैनिक आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथिने) उपयोग होणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे शरीरास ऊर्जा प्रदान होते, शरीराची झीज भरून निघते, विविध रोगांना शरीरास इजा पोहचविण्यास प्रतिबंध करते. परंतु औषधे किंवा काढा घेताना डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. सध्या व्हिटॅमिन सी, झिंक यासारख्या औषधींचा वापर वाढला आहे. परंतु ही औषधी किती प्रमाणात घ्यावीत हे तपासणीनंतरच कळू शकते. प्रत्येकाची उंची, वजन, वयानुसार औषधांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्रीदेखील वेगवेगळी असते. त्यामुळे एकच औषध तितक्याच प्रमाणात सर्वच व्यक्तींना लागू पडते असे नाही. यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करूनच औषधे घ्यायला हवीत.औषधी घ्यायची की नाही डॉक्टरांना ठरवू द्याकामामुळे बाहेर पडावे लागते, बाहेर जास्तवेळ थांबून काम करावे लागते, जास्त लोकांशी संपर्क येतो, म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविणाºया औषधांची व काढ्यांची मागणी वाढली आहे. परंतु उष्णता वाढणे, पुरळ येणे, अ­ॅसिडिटीचा त्रास होणे असे साईड इफेक्ट दिसू शकतात. यामुळे आपल्याला कोणते औषधे जास्त परिणामकारक व साईड इफेक्ट न करणारे आहेत, हे पाहणे गरजेचे असते. त्यामुळे कोणते औषध घ्यायचे ते डॉक्टरांना ठरवू देण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.बाजारात मिळणाऱ्या काढ्यांच्या पावडरांचे वैज्ञानिक संशोधन झालेले नसते. काही च्यवनप्राशमध्ये हेवी मेटल्स असतात. यामुळे यकृतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बाजारात उपलब्ध औषधी घेण्याआधी तपासणी करणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषध विक्रीच्या दुकानातून औषधे घेणे टाळायला हवे. तसेच एखाद्याला दिलेली औषधी दुसऱ्याला देणे अपायकारक ठरू शकते.-डॉ. सुशांत मेश्रामप्रमुख, श्वसनरोग विभाग मेडिकल

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य