शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

नागपुरात म्युकरमायकोसिसचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 22:55 IST

Increased risk of Mucormycosis infarction कोरोना नियंत्रणात येत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठ दिवसात १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७ रुग्णांचा जीव गेला आहे.

ठळक मुद्देआठ दिवसात १५९ रुग्ण, १७ मृत्यू : रुग्णसंख्या १३६९ तर मृतांची संख्या १२८

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना नियंत्रणात येत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठ दिवसात १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७ रुग्णांचा जीव गेला आहे. नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या १,३६९ झाली आहे, तर मृतांची संख्या १२८ वर गेली आहे. शनिवारी १९ नवे रुग्ण व २ मृत्यू नोंदविण्यात आले.

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी आरोग्य विभागाने गंभीर इशारा दिला आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र, मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. म्युकरमायकोसिसला दूर ठेवण्यासाठी रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला जात आहे. नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एप्रिल महिन्यापासून रुग्ण वाढायला लागले असले तरी रुग्णांची संख्या कमी होती. परंतु मे महिन्यात मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आल्याने मेयो, मेडिकलला या आजाराच्या स्वतंत्र वॉर्डाची सोय करण्याची गरज पडली. धक्कादायक म्हणजे, ४ जून रोजी नागपूर जिल्ह्यात या आजाराचे १२१० रुग्ण व १११ मृत्यू असताना आठ दिवसात म्हणजे, १२ जून रोजी रुग्णसंख्या वाढून १३६९ झाली असून मृतांचा आकडा १२८वर पोहचला आहे. मृतांच्या वाढलेल्या संख्येमागे अनेक कारणांपैकी ‘अ‍ॅम्पोटेरीसीन बी लायपोसोमल’चा तुटवडा, हे कारण दिले जात आहे. सध्या ४८१ रुग्ण उपचाराखाली आहेत.

९९३ रुग्णांवर शस्त्रक्रिया

शासकीय रुग्णालयात आतापर्यंत ४४२ रुग्णाची नोंद व २५ मृत्यू तर, खासगी रुग्णालयात ९२७ रुग्णांची नोंद व १०३ मृत्यू झाले आहेत. १३६९ रुग्णांमधून ७६० रुग्ण बरे झाले आहेत. ९९३ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या शासकीय रुग्णालयात २९७ तर खासगी रुग्णालयात १८४ असे एकूण ४८१ रुग्ण उपचाराखाली आहेत.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसnagpurनागपूर