पॅनेल ठरविताना गावागावात वाढला गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:04+5:302020-12-26T04:08:04+5:30

कुही : नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक २५ ग्रा.पं.च्या निवडणुका कुही तालुक्यात होऊ घातल्या आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ...

Increased involvement in deciding the panel | पॅनेल ठरविताना गावागावात वाढला गुंता

पॅनेल ठरविताना गावागावात वाढला गुंता

कुही : नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक २५ ग्रा.पं.च्या निवडणुका कुही तालुक्यात होऊ घातल्या आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होऊन दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी तालुक्यात आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. इकडे आधी काढण्यात आलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने गावाची निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढवावी हा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाल्याची चर्चा झाली. त्यामुळे अनेक गावात पॅनेलचा गुंता अद्याप सुटलेला नसल्याने निवडणूक अर्ज दाखल होण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे. इकडे ग्रा.पं.निवडणूक एकसंघ होऊन लढण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे. मात्र महाविकास आघाडीचा हा निर्णय अद्याप गावपातळीवर रुचलेला दिसून येत नाही. त्यामुळे गावागावात उमेदवारांची निवड करताना तालुकास्तरावरील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र दिवस आलेल्या सार्वजनिक सुट्या आणि यानंतर शेवटच्या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेता तालुका प्रशासनाची मात्र निश्चितच दमछाक होणार आहे. ग्रा.पं.निवडणुकीसाठी ३० डिसेंबर ही शेवटी तारीख आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. ४ जानेवारीला चिन्ह वाटपाची प्रक्रिया होईल.

Web Title: Increased involvement in deciding the panel