पदवीधर निवडणुकीसाठी दोन केंद्रांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:44+5:302020-11-28T04:06:44+5:30
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी दोन मतदार केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मतदारांची संख्या ...

पदवीधर निवडणुकीसाठी दोन केंद्रांची वाढ
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी दोन मतदार केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मतदारांची संख्या व कोरोनाची पार्श्वभूमी पाहता ही वाढ झाली आहे. आता विभागात एकूण ३२२ मतदार केंद्र झाली आहेत.
निवडणूक आयोगाने आपल्या २३ तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली होती. यामध्ये ३२० केंद्र निश्चित केले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला हव्या, असे आयोगाने स्पष्ट केले होते. याच सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यात दोन केंद्र वाढवण्यात आले आहे. यामध्ये सक्करदरा मतदान केंद्र क्रमांक ८० व अयोध्या नगर मतदान केंद्र क्रमांक १०४ येथे दोन सहायकारी मतदान केंद्र राहतील. त्यामुळे जिल्हातील केंद्राची संख्या १६४ झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.
जिल्हानिहाय मतदार केंद्र संख्या
जिल्हा-मतदार केंद्र
नागपूर- १६४
भंडारा- ३१
गोंदिया- २१
वर्धा- ३५
चंद्रपूर- ५०
गडचिरोली - २१