क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार रकमेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:48+5:302021-03-04T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धांमध्ये सहभागी ...

क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार रकमेत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणा-यांना ३० हजार तर प्रथम येणा-यांना ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानंतर यासंदर्भातील निर्देश जारी करण्यात आले.
नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी दरवर्षी विविध पातळ्यांवर आपले कर्तृत्व दाखवत असतात. चांगली कामगिरी करूनदेखील या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पुरस्काराची राशी कमी असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली होती. हा निधी वाढविण्याची मागणी होत होती. जानेवारीत झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमधील सहभगी विजेत्यांनाही सन्मानपूर्वक पुरस्कार राशी देऊन गौरवण्यात येणार आहे.