शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

ऑक्सिजन निर्मिती वाढवा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 9:14 PM

जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे ८० टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये पुरवठाधारकांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांचे अधिष्ठाता, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह ३२ खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम यानुसार या काळामध्ये जिल्ह्यांमध्ये कमाल मर्यादेपर्यंत ऑक्सिजनची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यापैकी केवळ ८० टक्के ऑक्सिजन हा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले.वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी ठेवणार नियंत्रणया पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्याकडे हे अधिकारी दररोज यासंदर्भातील अहवाल देणार आहेत. नागपूर जिल्ह्यात आठ कंपन्या ऑक्सिजन तयार करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव ऑक्सिजनची (लिक्विड ऑक्सिजन) आवश्यकता असते. निर्मिती करणाºया आठही पुरवठादारांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या