शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

देशातील लुप्त होणाऱ्या गिधाडांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:59 IST

सप्टेंबर २००० मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्यांतील प्रमुख वन्यजीव वॉर्डन यांना गिधाड संवर्धन कार्यक्रम तयार करण्यास सांगितले होते. कारण भरतपूर अभयारण्यातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश यांनी केलेल्या अभ्यासानुसार गिधाडांचे घरटे कमी पडले होते.

ठळक मुद्देनागपूरचे आर.डी. जकाती आहेत देशातील गिधाड प्रजनन प्रक्रियेचे प्रणेतेगुरांना देण्यात येणाऱ्या औषधांचा सुचविला पर्याय

उदय अंधारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूळचे नागपूरचे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीचे सेवानिवृत्त संचालक आर.डी. जकाती यांनी हरियाणातील पंचकुला रिजनचे मुख्य वन्यजीववार्डन पदावर कार्यरत असताना भारतातील पहिले गिधाड प्रजनन सेंटर पंचकुलापासून सात किमी अंतरावर पिंजोरजवळील बीड शिकारगा येथे यशस्वीरीत्या स्थापन केले. जकाती हे भारतातील गिधाड प्रजनन प्रक्रियेचे प्रणेते ठरले आहेत.त्यांनी गिधाड संवर्धन कार्यक्रमांतर्गत पहिले बंदिस्त प्रजनन केंद्र सुरू केले आणि लुप्त होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींची संख्या ३० वरून सध्या ५ हजारांपर्यंत वाढविण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नाने पश्चिम बंगाल आणि आसाम येथे आणखी दोन बंदिस्त प्रजनन केंद्र सुरू करण्यात आली असून त्यामुळेच आता गिधाडे लाल यादीतून वगळण्यात आली आहेत. सध्या बीड शिकारगा हे केंद्र आंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र बनले आहे. आता नेपाळ, बांगलादेश, कम्बोडिया आणि व्हिएतनाममधील शास्त्रज्ञ या केंद्राला प्रशिक्षणासाठी भेट देतात.आर.डी. जकाती यांनी लोकमतला सांगितले की, सप्टेंबर २००० मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्यांतील प्रमुख वन्यजीव वॉर्डन यांना गिधाड संवर्धन कार्यक्रम तयार करण्यास सांगितले होते. कारण भरतपूर अभयारण्यातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश यांनी केलेल्या अभ्यासानुसार गिधाडांचे घरटे कमी पडले होते.शतकानुशतकेच्या सुरुवातीच्या ३३० पासून केवळ ३० पर्यंत गिधाडांची संख्या राहिली होती. जकाती यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमधील (बीएनएचएस) डॉ. विभू प्रकाश, यूकेच्या इस्टिट्यूट ऑफ प्राणिशास्त्रचे प्रोफेसर डॉ. अ‍ॅन्ड्रू कुनिनघम आणि यूकेच्या रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्सचे डॉ. डॉबी पेन यांच्यासोबत बीड शिकारगा येथील संशोधन केंद्रासाठी पहिले पाऊल उचलले.सुरुवातीला जकाती यांनी इतर राज्यांतील आपल्या साथीदारांना फोन करून भारताच्या निरनिराळ्या भागांतून ४० गिधाडे पकडण्याचे ठरविले. कारण गिधाडांच्या मृत्यूचे कारण अद्याप माहीत नव्हते. म्हणून गिधाडांना मृत प्राण्यांना खायला दिले. त्यामध्ये सर्व गिधाडे जिवंत राहिली. २००१ मध्ये जेव्हा गिधाडांसाठी बंदिस्त प्रजनन कार्यक्रम सुरू केला गेला, तेव्हा प्रजननासाठी कोणतीही गिधाडे उपलब्ध नव्हती. कारण त्याकाळात ९० टक्के गिधाडे गुरांच्या शरीरात सापडलेल्या अवशिष्ट डिक्लोफेनॅकचे सेवन करून मरण पावले होते. म्हणूनच जकाती यांना बीड शिकारगा येथे विमानातून विमानात गिधाडांची वाहतूक करावी लागली होती. गिधाडांचा मृत्यू हा मृत गाई-म्हशींचे सेवन केल्यामुळे २००३ मध्ये त्यांना आढळून आले. गाई-म्हशींना डिक्लोफेनॅक हे एक नॉन-स्टिरॉइडल औषध देण्यात आले होते. नंतर गिधाडांमध्ये नर व मादी यांची ओळख पटविण्याची समस्या उद्भवली. सुरुवातीला २००६ मध्ये केंद्राकडे केवळ दोन अंडी होती, त्यापैकी दोन्ही अंडी खराब झाली होती. २००७ मध्ये चार अंडी विकसित केली गेली, त्यापैकी दोन चांगली आणि दोन खराब झाली. नंतर दोन अंडी फलित झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू दोन दिवसानंतर तर दुसऱ्याचा एका महिन्यानंतर मृत्यू झाला. पण रसायनशास्त्रात सुवर्णपदक मिळविणारे जकाती यांनी अंड्यांची संख्या वाढविण्यासाठी डबल क्लच पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीतील दोन अंड्यांपैकी एक प्रयोगशाळेत उष्मायनास आली तर मादी दुसऱ्या अंड्यावर बसली.आज जकाती आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी पांढऱ्या पाठीचा गिधाड, लांब बिल्ड गिधाड आणि बारीक बिल्ड गिधाड अशा तीन प्रजातींवर काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता सर्वच केंद्रांवर प्रजनन उत्तमरित्या प्रजनन होत आहे.आर. डी. जकातीचे नागपूर नातेआर. डी. जकाती यांनी वर्र्ध्याजवळील पुलगाव येथून मॅट्रिक केले. त्यानंतर १९७१ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवी संपादन केली. १९७३ मध्ये केमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली. १९७४ ते ७५ या काळात ते एम. पी. देव मेमोरिअल धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये केमेस्ट्रीचे प्राध्यापक होते. तर १९८१ ते ८६ पर्यंत त्यांनी भारतीय वन सर्वेक्षण विभाग, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर उपसंचालक म्हणून काम पाहिले.डायक्लोफेनाकवर बंदीसाठी जकाती यांची मदत३ मिलीपेक्षा जास्त डायक्लोफेनाक (पॅकेजिंग आणि वितरण) बंदी घालण्यासाठी सरकारला खात्री पटवून देण्यात जकाती यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या उद्देशाने, त्यांनी भारत सरकारच्या आरोग्य सचिवांकडे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आणि २००७ मध्ये डिक्लोफेनाकवर बंदी घालण्यात यश मिळविले. मेलोक्सिकनला डायक्लोफेनाकचा पर्याय म्हणून ओळख करून देण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या प्रयत्नांमुळे सध्या प्राण्यांवर औषधांच्या क्लिनिकल चाचण्यादेखील मानवाप्रमाणेच केल्या जातात. त्यामुळे औषधांची सुरक्षा सुनिश्चित केली जाते. आता गिधाडे जंगलात सोडण्याची वेळ आली आहे. यासाठी उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश सेफ झोन ओळखले गेले आहेत.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव