लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतत दोन रात्री उड्डाण करणाऱ्या वैमानिकांच्या 'मिडनाइट ड्यूटी'च्या गणनेत बदल करण्यात आला आहे. आता वैमानिकांची मध्यरात्रीची ड्यूटी पहाटे ५ ऐवजी ६ वाजेपर्यंत मोजली जाईल. ही सुधारणा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जाहीर केली असून, ती १ नोव्हेंबरपासून लागू होईल.
या बदलानुसार वैमानिकांना त्यांच्या एकूण १० तासांच्या फ्लाइट ड्यूटी टाइममध्ये आता रात्री १२ ते १:५५ आणि पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान सेवा देण्याची मुभा असेल. त्यामुळे वैमानिक आता तिसरी लँडिंगही करू शकतील. यापूर्वी मिडनाइट अव्हर्समध्ये केवळ दोन लँडिंगपुरती मर्यादा होती.
नव्या नियमानुसार वैमानिकाने सलग दोन रात्री उड्डाण केले असेल, तर त्याला ४८ तासांची अनिवार्य विश्रांती कालावधी मिळेल. जर ड्यूटी सतत रात्रीची नसेल, तर पूर्वीप्रमाणेच १४ तास ४५ मिनिटांचा विश्रांती कालावधी लागू राहील. ड्यूटीदरम्यान वेळेत उड्डाण न झाल्यास किंवा विलंब झाल्यास वैमानिक आणि संबंधित एअरलाइन्स दोघांनाही डीजीसीएकडे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
उड्डाणादरम्यान हवामानातील बदल अर्थात वादळ, पाऊस, धुके किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमुळे उड्डाणाला उशीर होत असेल तर वैमानिकाला एक्स्टेंशन घेण्यास नकार देण्याचा अधिकार राहील. वैमानिकाने एक्स्टेंशन घेतलेच, तर त्याची माहिती वेळेत डीजीसीएला देणे बंधनकारक असेल.
हवामानामुळे झालेल्या विलंबास वैमानिक जबाबदार नाही
विमान आधीच आकाशात असेल आणि हवामान किंवा अन्य कारणांमुळे लैंडिंगला उशीर झाला, तर अशा परिस्थितीला 'बियॉन्ड कंट्रोल' असे समजले जाईल. अशा वेळी वैमानिकाला डीजीसीएकडे कोणतेही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता राहणार नाही.
Web Summary : Pilots' midnight duty now extends to 6 AM, effective November 1, per DGCA. This allows for more flexibility in flight duty time, potentially enabling a third landing. Extended rest periods are mandated after consecutive night flights. Delays due to weather are exempt from pilot explanation.
Web Summary : डीजीसीए के अनुसार, पायलटों की मिडनाइट ड्यूटी अब 1 नवंबर से सुबह 6 बजे तक बढ़ाई गई है। इससे उड़ान ड्यूटी के समय में अधिक लचीलापन आएगा, संभावित रूप से तीसरी लैंडिंग संभव हो सकेगी। लगातार रात्रि उड़ानों के बाद विस्तारित विश्राम अवधि अनिवार्य है। मौसम के कारण होने वाली देरी के लिए पायलट को स्पष्टीकरण देने की आवश्यकता नहीं है।