शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात वाढवा, अर्थव्यवस्था मजबूत करा  : जयकरण सिंह यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:00 IST

केंद्राने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्यात वाढीनेच अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन मिहानचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त डीजीएफटी जयकरण सिंह यांनी येथे केले.

ठळक मुद्दे व्हीआयएतर्फे आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील निर्यातदारांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन निर्यात वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. केंद्राने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्यात वाढीनेच अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन मिहानचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त डीजीएफटी जयकरण सिंह यांनी येथे केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे (व्हीआयए) निर्यात धोरणावर सिव्हील लाईन्स येथील उद्योग भवनात आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, उपाध्यक्ष आदित्य सराफ, व्हीआयए एक्झिम फोरमचे अध्यक्ष प्रतिक तापडिया, सचिव गौरव सारडा उपस्थित होते.जयकरण सिंह म्हणाले, केंद्र सरकारतर्फे निर्यात धोरणांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहे. याचप्रकारे ‘निर्यात बंधू’ योजना सुरू आहे. त्याची समीक्षा करण्यात येत आहे. विदर्भातील उद्योजक आणि व्यापारी या योजनेचा लाभ घेऊन स्वत:ला सक्षम बनविण्यासाठी विभागाची मदत घेऊ शकतात. त्या माध्यमातून निर्यात वाढविता शक्य होणार आहे. ते म्हणाले, विदर्भात निर्यातीच्या अपार संधी आहेत. एक हजारापेक्षा जास्त लोक आयात-निर्यात व्यवसायात आहेत. ही संख्या वाढविण्याची गरज आहे. याकरिता नवीन गुंतवणूक आकर्षित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मिहान प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे. त्याचा लाभ उद्योजकांना मिळणार आहे. येथे पायाभूत सुविधा तयार आहेत. कंपन्यांना आकर्षित करण्याची गरज असल्याचे सिंह म्हणाले.उपडीजीएफटी डॉ. दिराज दाभोळे यांनी केंद्राने सुरू केलेल्या निर्यात बंधू योजनेची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, विदेशी व्यापार धोरणांतर्गत उद्योगांना इन्सेन्टिव्ह आणि सबसिडी मिळविण्याच्या संधी आहे. कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत करण्यात येत आहे.प्रारंभी सुरेश राठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन आणि आभार गौरव सारडा यांनी मानले. यावेळी असोसिएशनचे सदस्य, निर्यातदार, आयातदार आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर