शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:45 IST

ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबदलत्या वातावरणाचा शरीरावर प्रभाव : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर गारठले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. हे वातावरण विशेषत: घसा आणि फुफ्फुसामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ज्येष्ठांमध्ये वात, कंबरदुखी, मणक्यांचे आजारही बळावले आहेत.थंडी सुखद वाटत असली तरी वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा ऋतू त्रासदायक ठरतो. अंगातील ऊर्जा कमी झाल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवते. सांधेदुखी, सर्दी, खोकला, दमा यासारखे विकार थंडीत हमखास डोके वर काढतात. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी हे दिवस कसोटीचे असतात. मात्र थोडीफार काळजी घेतल्यास यातील बऱ्याचशा त्रासापासून सुटका होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.नवजात बालकांना हायपोथर्मियाची भीती-डॉ. अग्रवालबालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांनी सांगितले, नवजात बालके थंड पडल्यास ‘हायपोथर्मिया’ आजार होऊन जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असते. नवजात बालकांना किमान ३४ ते ३५ अंश तापमानाची गरज असते. यामुळे अशा बालकांना आईने वरचेवर दूध पाजावे. कापडात गुंडाळून ठेवावे. या दिवसात बाळाला आवश्यक उष्णता मिळणे आवश्यक असते.सर्दी, व्हायरलच्या रुग्णांनापासून दूर रहा- डॉ. गावंडेबालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, बदललेल्या या हवामानामुळे सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, दम्याचे दिसून येत आहे. या शिवाय, नाक चोंदणे, सारख्या शिंका येणे, डोळे लाल होणे, ऐकायला थोडे कमी येणे, डोकेदुखी, ताप, थकवा, भूक मंदावणे ही ‘व्हायरल’ तापाची लक्षणे आहेत. सध्या या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. हा ताप संसर्गजन्य असल्यामुळे आजारी व्यक्तींचा संपर्क टाळणे किंवा कमी करावा. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.अस्थमाच्या रुग्णांत ५० टक्क्याने वाढ -डॉ. गिल्लुरकरफिजिशियन डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले थंडी, हवेतील प्रदूषण व धुरामुळे अस्थमा म्हणजेच दम्याच्या रुग्णांत गेल्या काही दिवसात ५० टक्क्याने वाढ झाली आहे. यात साधारण १२ ते १८ आणि त्याही पुढील वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री खोकला येणे, सामान्य औषधांनीही बरा न होणे, दम लागणे ही अस्थम्याची लक्षणे आहेत. अशा रुग्णांची चाचणी करून किती श्वास नळ्या ‘ब्लॉक’ आहेत त्या तपासल्या जातात आणि त्यानुसार औषधोपचार केले जातात. यात ‘इनहेलर’ ही सर्वात फायदेमंद औषध आहे. वरील लक्षणे दिसणाºया रुग्णांनी त्वरित उपचार घेणे आवश्यक असते. 

‘हार्ट अटॅक’चा धोका वाढतो-डॉ. देशमुखहृदयविकार तज्ज्ञ डॉ. पी.पी. देशमुख म्हणाले, अतिथंडीमुळे रक्तवाहिन्या, सांधे अखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो. अशा परिस्थितीत हृदयविकार असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अ‍ॅटक) येण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा अंदाज नाही अशांसाठी हे धोकादायक ठरू शकते. म्हणून थंडीत हृदयाची काळजी घेणे आवश्यक असते.

 

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर