रॅमसन्स समूहावर आयकर धाडी
By Admin | Updated: November 18, 2015 03:00 IST2015-11-18T03:00:51+5:302015-11-18T03:00:51+5:30
स्टील व्यवसायात नागपुरात आघाडीच्या रॅमसन्स ग्रुप आॅफ कंपनी आणि त्याच्या सहयोगी कंपन्या, फर्म व संचालकांच्या...

रॅमसन्स समूहावर आयकर धाडी
कोट्यवधींची रोख, दागिने, कागदपत्रे जप्त : बँक खाते व लॉकर्स ताब्यात
नागपूर : स्टील व्यवसायात नागपुरात आघाडीच्या रॅमसन्स ग्रुप आॅफ कंपनी आणि त्याच्या सहयोगी कंपन्या, फर्म व संचालकांच्या निवासस्थानावर मंगळवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची रोख, दागिने, कागदपत्रे जप्त केली असून बँक खाते व लॉकर्स ताब्यात घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
हिंगणा व बाजारगांव येथे कंपन्या
रॅमसन्स समूह रामस्वरुप सारडा, लक्ष्मीनारायण सारडा, राजेश रामस्वरुप सारडा आणि सुरेंदरसिंग चहल यांचा आहे. समूहातर्फे रि-रोलिंग, टीएमटी स्टील बार, एमएस अॅन्गल, फ्लेक्स, अराऊंड, रॉड आदींचे उत्पादन करण्यात येते. या समूहाच्या एकूण पाच कंपन्या असून त्यापैकी राजाराम स्टील प्रा.लि. रॅमसन्स इस्पात प्रा.लि., रॅमसन्स रिफॅक्टरी प्रा.लि. या तीन कंपन्या एमआयडीसी, हिंगणा येथे तर रॅमसन्स टीएमटी प्रा.लि. आणि रॅमसन्स कास्टिंग प्रा.लि. या दोन कंपन्या बाजारगांव, अमरावती रोड येथे कार्यरत आहेत.