शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

आणखी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर छापे; कारवाईचा टप्पा वाढला

By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 2, 2023 22:48 IST

अनंत अग्रवाल, अरूण अग्रवाल, मनीष चढ्ढावर बुधवारी कारवाई

नागपूर : आयकर विभागाने बुधवारी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर गुरुवारी आणखी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. त्यातील एक भंडाऱ्याचा तर दोन नागपुरातील आहेत. नव्याने छापे टाकलेल्या व्यापाऱ्यांची बुधवारी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांशी लिंक समोर आली आहे. गुरुवारी टाकलेल्या धाडीत अवैध व्यवहाराची कागदपत्रे, रोख आणि लॉकर्स सापडल्याची माहिती आहे. आयकर विभागाने बुधवारी नागपुरातील संगीता सेल्स प्रा.लि.चे अनंत अग्रवाल व अरूण अग्रवाल या दोन भावांचे वर्धमाननगर येथील निवासस्थान व कार्यालये आणि चंद्रपूर येथील मनीष चढ्ढाचे घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

तपासणी आणि चौकशीदरम्यान त्यांच्याकडूनही अवैध कोळसा व्यवहाराची कागदपत्रे, कोट्यवधींची रोख आणि लॉकर्स जप्त केले होते. त्यात या तिघांच्या व्यवहाराची अन्य तीन व्यापाऱ्यांशी लिंक असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा अधिकाऱ्यांनी छापे टाकले. आता टप्पा वाढल्याने कारवाई किती दिवस सुरू राहील, हे आता सांगणे कठीण आहे. आणखी काही व्यापारी अग्रवाल आणि चढ्ढा यांच्याशी संबंधित आहेत का, याचा शोध आयकर अधिकारी घेत आहेत. ही कारवाई नागपुरातील आयकर विभागाच्या ५० हून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांनी लॉकर्समध्ये कोळसा व्यवहाराची कागदपत्रे लपवून ठेवल्याच अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे ते व्यापाऱ्यांची कसून तपासणी करीत आहेत. ही कारवाई शुक्रवारीही सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरIncome Taxइन्कम टॅक्स