नागपुरातील चार उद्योजकांवर आयकर विभागाच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:25 IST2020-01-16T13:25:02+5:302020-01-16T13:25:29+5:30
करचुकवेगिरी करणाऱ्या नागपुरातील चार उद्योजकांवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने धाडी टाकून रोख आणि अहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

नागपुरातील चार उद्योजकांवर आयकर विभागाच्या धाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : करचुकवेगिरी करणाऱ्या नागपुरातील चार उद्योजकांवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने धाडी टाकून रोख आणि अहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात आलेल्या उद्योजकांची नावे सांगण्यात नकार दिला. प्राप्त माहितीनुसार, प्रवीण तापडिया असे एका उद्योजकाचे नाव असून बुुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसी येथे कारखाने आहेत. ते विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. अन्य उद्योजक कामनानी हे पान मसाला उत्पादक आहेत.
धाडीच्या कारवाईत १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. विभागाने चारही उद्योजकांचे कारखाने, कार्यालय आणि निवासस्थानावर सकाळी एकाचवेळी धाड टाकल्याची माहिती आहे. व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून कारवाई शुक्रवारपर्यंत चालण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.