शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पदभरतीमुळे बदलापूरसारख्या घटना : शिक्षक संघटनांचा आराेप

By निशांत वानखेडे | Updated: August 26, 2024 19:24 IST

Nagpur : असे कामगार काेणत्या पार्श्वभूमीतून आले, त्यांचे शिक्षण काय, यावर नियंत्रण कुणाचे असते, असे प्रश्न उपस्थित

नागपूर : बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. यामुळे शाळेत मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेसाठी वेगवेगळ्या गाेष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. यात शासनाद्वारे कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे धाेरणही कारणीभूत असल्याचा आराेप शिक्षक संघटनांकडून हाेत आहे.

बदलापूरच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे १४ ऑगस्ट रोजी उजेडात आले. कंत्राटी पद्धतीने भरलेल्या अशा कर्मचाऱ्यांची विश्वासार्हता काय, असा सवाल शिक्षक संघटनांकडून विचारला जात आहे.राज्य सरकारने डिसेंबर २०२० ला शासन निर्देश काढून शासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चाैकीदार, प्रयाेगशाळा परिचर आदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरस्त करून कंत्राटी पद्धतीने भरण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी सरकारने मुंबई व पुणे महापालिका क्षेत्रातील शाळांसाठी, इतर महापालिका क्षेत्रातील शाळांसाठी आणि ग्रामीण भागातील शाळांसाठी शिपाई भत्ता निर्धारित केला आहे. 

त्यानुसार राज्यात कंत्राटदार कंपन्यांना या कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट दिले जात आहे. असे कामगार काेणत्या पार्श्वभूमीतून आले, त्यांचे शिक्षण काय, यावर नियंत्रण कुणाचे असते, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नियमित कर्मचारी हे शाळेसाठी बांधिल असतात. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची विश्वासार्हतेची हमी काय, असा सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरShikshak Senaशिक्षक सेनाnagpurनागपूर