शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनचे डिसेंबर १८ ते २० दरम्यान उद्घाटन :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:06 IST

मेट्रो रेल्वेची अ‍ॅक्वा लाईन अर्थात सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंतच्या रिच-३ लाईनचे उद्घाटन डिसेंबर १८ ते २० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देपाच स्टेशन कार्यरत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेची अ‍ॅक्वा लाईन अर्थात सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंतच्या रिच-३ लाईनचे उद्घाटन डिसेंबर १८ ते २० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी स्थानिक खासदार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री हजर राहणार असल्याची माहिती आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी मेट्रोचे अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. तारीख आणि वेळ लवकरच निश्चित होणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.शुक्रवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी झाशी राणी मेट्रो स्टेशनची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री १६ ते २१ डिसेंबरपर्यंत नागपुरात असून त्यांच्या हस्ते अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन करण्याचा महामेट्रो प्रशासनाचा मानस आहे. रिच-३ मार्गावर लोकमान्यनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, झाशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन प्रवाशांसाठी तयार आहेत.यापूर्वी अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण हवामान खात्याने त्या दिवशी वादळी पावसाचा इशारा दिल्यानंतर पीएमओ कार्यालयाने पंतप्रधानांचा दौरा रद्द केला होता. पंतप्रधानांनी मेट्रोच्या वर्धा मार्गाप्रमाणेच व्हिडिओ कॉन्फरसिंगने अ‍ॅक्वा मार्गाचे उद्घाटन करण्याची तयारी दर्शविली होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे नागपुरात येऊन उद्घाटन करण्याची विनंती केली होती. पण मध्यंतरी निवडणुकांमुळे त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. आता महामेट्रो प्रशासनाने नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे.अ‍ॅक्वा लाईनच्या उद्घाटनानंतर हिंगणा भागातून सीताबर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. उद्घाटनानंतर मेट्रोचे रिच-१ वर्धा मार्ग आणि नव्याने रिच-३ हिंगणा हे दोन मार्ग प्रवाशांसाठी खुले होणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर मेट्रोच्या महसुलात वाढ होईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अ‍ॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर स्टेशनवरून मेट्रोने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवक-युवतींची संख्या वाढणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे