लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन

By Admin | Updated: February 13, 2016 02:49 IST2016-02-13T02:49:16+5:302016-02-13T02:49:16+5:30

शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली न्याहाळून ग्राहकांना खरेदीची संधी आहे, ...

Inauguration of Lokmat Property Expo | लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन

विकासासाठी तत्पर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे प्रतिपादन
नागपूर : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली न्याहाळून ग्राहकांना खरेदीची संधी आहे, शिवाय त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नागपूरचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी येथे केले.

तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मैदानात १२ ते १४ फेब्रुवारी यादरम्यान केले आहे. शुक्रवारी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, एसडीपीएलचे संचालक गौरव अगरवाला, अभिजित रिएलेटर्स अ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.चे प्रमुख अभिजित मुजुमदार, टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक विलास हरडे, जीवन घिमे, नरेन डाखळे, राजेंद्र नाकाडे, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्सचे अमित जयस्वाल, अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्सचे संचालक नरेंद्र मल्लेलवार, पंजाब नॅशनल बँकेचे सर्कल हेड एच.के. भुटानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सचिव कुर्वे म्हणाले, नागपूरच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी विकासात्मक बाबी घेऊन आपल्याकडे यावे. अशाप्रकारचे प्रदर्शन निरंतर सुरू राहावेत. उद्घाटनानंतर कुर्वे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. हे प्रदर्शन शिस्तबद्ध, आकर्षक आणि अनोखे आयोजन असल्याचा शेरा त्यांनी दिला.
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पो सर्वोत्तम आहे. सर्व प्रॉपर्टीज एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीज ग्राहकांना बघता येईल. या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास नामांकित कंपन्यांच्या संचालकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. प्रदर्शनात प्रवेश नि:शुल्क असून एकूण २४ स्टॉलला भेट देऊन तेथील प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्याची ग्राहकांना संधी आहे.(प्रतिनिधी)

प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी नामांकित कंपन्या
तुषार मंजुळे यांनी जिंकले सोन्याचे नाणे
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये दररोज भाग्यशाली सोडत काढण्यात येणार असून, विजेत्याला सोन्याचे नाणे भेटस्वरूपात देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत जुना सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी तुषार मंजुळे विजेते ठरले आहेत. त्यांना सोन्याचे नाणे देण्यात आले.

अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि.
टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.
संदीप डेव्हलपर्स प्रा.लि.
अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स
आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्स
पायोनियर ग्रुप,
पिरॅमिड सिटी
नीलगगन डेव्हलपर्स
लेव्हरेज गु्रप
नानीक गु्रप
पंजाब नॅशनल बँक
गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स अ‍ॅण्ड प्रमोटर्स
श्री माँ महालक्ष्मी इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.
बँक आॅफ महाराष्ट्र
कृष्णा गु्रप
पुष्कर होम्स प्रा.लि.
एन.के. रिएलेटर्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.
श्री केएसडी ग्रुप
जीबीटी बिल्डटेक प्रा.लि.
बरडे ग्रुप
हरिहर बिल्डस्पेस प्रा.लि.
आमात्रा फार्मस
तेजोमया अ‍ॅस्ट्रल
सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि.

Web Title: Inauguration of Lokmat Property Expo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.