शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भारतातील पहिल्या मेट्रो सेफ्टी पार्कचे उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:10 IST

महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथे निर्मित सेफ्टी पार्क देशातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सेफ्टी पार्कची अनोखी संकल्पना राबविल्याबद्दल नागपूर मेट्रोचे कौतुक केले. नागपूर मेट्रोतर्फे राबविलेल्या सेफ्टी पार्क प्रकल्पातून प्रेरणा घेत देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांनी अशा पार्कची उभारणी करावी, असे आवाहन मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्दे देशात असे पार्क उभारावेत : केंद्रीय सचिव मिश्रा यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथे निर्मित सेफ्टी पार्क देशातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सेफ्टी पार्कची अनोखी संकल्पना राबविल्याबद्दल नागपूरमेट्रोचे कौतुक केले. नागपूर मेट्रोतर्फे राबविलेल्या सेफ्टी पार्क प्रकल्पातून प्रेरणा घेत देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांनी अशा पार्कची उभारणी करावी, असे आवाहन मिश्रा यांनी केले.हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथील भारतातील पहिल्या मेट्रो सेफ्टी पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक संचालक डॉ. बृजेश दीक्षित, दिल्ली मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह, चेन्नई मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार बन्सल, मेगा मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आय.पी.गौतम, लखनौ मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक कुमार केशव, एनसीआरटीसी मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार सिंह, नागपूर मेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, नागपूर मेट्रोचे वित्त संचालक एस. शिवमाथन, नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.लिटील वूड येथे महामेट्रोतर्फे ५५०० झाडे लावली असून यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जगली आहेत. विविध प्रकारची आणि प्रजातीची झाडे लावण्यात आली असून या संपूर्ण प्रकल्पाला राज्याच्या वन विभागाने सहकार्य केले आहे. लिटील वूडजवळ प्रस्तावित ६०० चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेवर सेफ्टी पार्क तयार करण्यात आले आहे. यात तीन षटकोनी संरचना वेगवेगळ्या उद्देशाने कार्य करेल. सेफ्टी पार्कचे सौंदर्यपूर्ण डिझाईन करण्यात आले असून ते नागरिकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने आकर्षक ठरणार आहे.विविध शासकीय आणि अशासकीय विभागात कार्य करणाऱ्यांना, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना आणि इतर सर्व नागरिकांना सेफ्टी पार्कमध्ये बांधकामाशी संबंधित सर्व क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या सुरक्षा नियमाची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुरक्षेसंबंधित मॉडेल प्रशिक्षण संस्था म्हणून हा पार्क काम करणार आहे. त्यामुळे सुरक्षाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर