शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे ऑगस्टमध्ये उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:07 IST

सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गावर मेट्रो रेल्वेची वाहतूक सुरू आहे, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गावर मेट्रो रेल्वेची वाहतूक सुरू आहे, हे विशेष.पूल अजनी चौक ते सोनेगाव पोलीस ठाण्यापर्यंत असून, एकूण लांबी ३.४ किमी, रुंद १९.६ मीटर आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी ४५० कोटींचा खर्च आला आहे. डबलडेकर पुलावर सर्वात वर मेट्रो रेल्वे, मध्ये उड्डाणपूल आणि खाली राष्ट्रीय महामार्ग आहे. पुलाचे बांधकाम जानेवारी २०१७ मध्ये सुरू झाले असून काम पूर्णत्वास येत आहे. जॉईंट, लाईट आणि मार्गाचे इतर काम मार्चपर्यंत तर मनीषनगर सब-वेचे काम आणि डबलडेकर पुलाचे काम मे ते जूनदरम्यान पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला होता. पण लॉकडाऊनमुळे कामाला विलंब झाला आहे.मनीषनगर ‘आरयूबी’ ऑगस्टमध्येमनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्याकरिता नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून यावे लागते. फाटक बंद झाल्यावर नागरिकांना बराच वेळ थांबावे लागते. या ठिकाणी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होती. महामेट्रोने हे काम हाती घेतले. लवकरच हा मार्गही पूर्ण होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. आरयूबी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूने ये-जा करता येणार आहे. वर्धा मार्गावरून डावीकडे आरयूबीमधून जाताना प्रारंभी खुल्या आरयूबीच्यावर फ्रेम लावण्याचे कार्य पूर्ण झाले असून, त्यावर पॉलिकार्बोनेट शीट लावण्यात आली आहे.पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणारलॉकडाऊनच्या काळात या मार्गावरील बांधकाम बंद होते. या मार्गावर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम झाले आहे. विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक लवकरच सुरू होईल.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन), महामेट्रो.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर