धांदे आय हॉस्पिटलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:17+5:302021-02-15T04:09:17+5:30

नागपूर : डोळ्यांचा आधुनिक पद्धतीने उपचार आणि विविध उपकरणांनी सुसज्ज धांदे आय हॉस्पिटलचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते ...

Inauguration of Dhande Eye Hospital | धांदे आय हॉस्पिटलचे उद्घाटन

धांदे आय हॉस्पिटलचे उद्घाटन

नागपूर : डोळ्यांचा आधुनिक पद्धतीने उपचार आणि विविध उपकरणांनी सुसज्ज धांदे आय हॉस्पिटलचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते रविवारी झाले. याप्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, आ. विकास ठाकरे, डॉ. दिलीप धांदे, विजया धांदे उपस्थित होते.

नेत्रतज्ज्ञ डॉ. पूजा धांदे हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. हॉस्पिटल २०४, दुसरा माळा, मनोमय प्लाझा, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ येथे आहे.

डॉ. पूजा धांदे यांनी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेजमधून एमबीबीएस आणि तिरुनलवेल्ली (तामिळनाडू) येथील अरविंद आय हॉस्पिटलमधून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. मोतीबिंदू, काचबिंदू आणि विशेष म्हणजे लहान मुलांच्या डोळ्यांच्या उपचारतज्ज्ञ आहेत. त्यांनी अमेरिकेतील विस्कॉनसिन मेडिसीन येथे लहान मुलांच्या डोळ्यांच्या उपचारावर तीन वर्षे विशेष प्रशिक्षण घेतले. केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केले आहे. हॉस्पिटल ८०० चौरस फूट जागेत असून, डोळ्यांच्या उपचारासाठी उपयुक्त आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.

याप्रसंगी अ‍ॅड. राहुल धांदे, सुनीता धांदे, निवृत्त न्यायाधीश अरुण चौधरी व रवी देशपांडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, महानंदा डेअरीचे चेअरमन रणजित देशमुख, शरयू रणजित देशमुख, मयुरा काळे, रामकिशन (मुन्ना) ओझा, मनोज गोलावार, सुरेश नायर, जयंत तडतकर, अनंतराव घारड, डॉ. जय देशमुख, डॉ. मदन कापरे, डॉ. शिरीष धांदे, डॉ. सुरेश निनावे, डॉ. अनुप रडके, माधव सोलव, डॉ. प्रफुल्ल मोकदम, डॉ. जयंत खडतकर, डॉ. विनय नांगिया, डॉ. हेमंत देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Dhande Eye Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.