शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात अनेक गावांचा संपर्क तुटला; अनेत तालुक्यात अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 08:20 IST

यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दाेन दिवसांत पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी ८:३० पर्यंत येथे सर्वाधिक २४२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गडचिराेली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून, अद्यापही अनेक गावांचा संपर्क शहरापासून तुटलेला आहे. अमरावती  विभागात २४ तासांत ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात १०३.८ मिलीमीटर, यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात ९७.३, मालेगाव १३७.३, मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आठ गावांचा अद्यापही काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

मामुलवाडी (ता. नांदुरा जि. बुलढाणा) येथील एका वृद्धाचा मंदिराची भिंत पडल्याने मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मलकापूर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे. अकोला जिल्ह्यात चिखली व खरब ढोरे या गावांना पुराचा वेढा बसला आहे.

वीज पडून दोघे ठारचिखलदरा  तालुक्यातील मोरगड येथे बुधवारी दुपारी दाेन वाजता शेतात निंदण थांबवून मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी झाडाखाली आश्रय घेतला, तर काही प्लास्टिकची पन्नी अंगावर घेऊन शेतात उभे राहिले. ते उभे असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने एकाचा घटनास्थळी, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सात मजुरांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ