शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जीवन-मरणाच्या 'त्या' घनघोर झुंजीत बिबट हरला, सायाळ जिंकला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 21:12 IST

Nagpur News वन्यजीवांमध्ये होणारी झुंज ही नेहमीच शर्थीची राहिली आहे. सोमवारी सकाळी सोनवाढोणा-बोरगाव मार्गावर अशाच एका झुंजीत बिबटाने सायाळापुढे शरणागती पत्करली.

ठळक मुद्देबिबटाच्या सर्वांगावर आढळल्या काट्याच्या जखमा

यवतमाळ : वन्यजीवांमध्ये झालेल्या झुंजीत बिबट हरला, तर सायाळ हा प्राणी जिंकला. हा प्रकार सोमवारी सकाळी सोनवाढोणा-बोरगाव मार्गावर उघडकीस आला. बिबटच्या सर्वांगावर सायाळ प्राण्याने काट्याने टोचल्याचे दिसून आले. गळ्यालाही मोठमोठ्या जखमा आढळून आल्या.

मालखेड बिटामध्ये रस्त्याच्या कडेला बिबट मृत्युमुखी पडून असल्याचे एका वाहनचालकाला दिसले. या प्रकाराची माहिती वन विभागाला देण्यात आली. नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोव्हळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या पाहणीत सायाळच्या हल्ल्यातच बिबट मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले.

यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव दाभळे, उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, संतोष ठाकरे, अशोक कदम, विनोद आठवले आदी घटनास्थळी धडकले. पंचनामा करून मृत बिबट शवचिकित्सेसाठी नेर येथे रवाना करण्यात आला. यानंतर वन विभागाच्या परिसरात बिबटाला अग्नी देण्यात आला.

संपूर्ण प्रक्रिया मालखेड बीटचे क्षेत्र सहायक एस.वाय. वाघमारे, सोनखास उपवन परिक्षेत्राचे व्ही.बी. उमाटे, वनरक्षक एस.बी. जुवार, वैशाली खडके, ठाकरे, अशोक कदम, गोविंद राठोड, हरिचंद्र राठोड, सुखदेव राठोड, राजू शेलोटकर, दिनेश चव्हाण आदींनी पार पाडली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव