शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

नाेव्हेंबरला दिवसागणिक घसरेल पारा, वाढेल थंडी; दशकाच्या ट्रेंडनुसार १० अंशांवर जाईल तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 11:29 IST

पुढचा आठवडाभर असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र तापमान घसरेल व थंडीचा जाेर वाढेल

नागपूर : देशात साधारणत: नाेव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात हाेते. अर्धा महिना कमाल व किमान तापमान सरासरीतच असते व त्यानंतर पारा घसरताे. गेल्या दशकभरात नाेव्हेंबरमध्येच थंडीने सतावले आहे. हा ट्रेंड यावेळीही कायम राहणार, असे संकेत आताच मिळत आहेत. सध्या दिवसाचे तापमान ३० अंश व रात्रीचे तापमान १६ ते १७ अंशांच्या सरासरीत असून, रात्री गारवा जाणवताे आहे. पुढचा आठवडाभर असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र तापमान घसरेल व थंडीचा जाेर वाढेल, अशी शक्यता आहे.

हवामान विभागाच्या दशकभराच्या अभिलेखानुसार नाेव्हेंबर महिन्यातही थंडीचा तडाखा जाणवला आहे. मात्र, पंधरवड्यानंतर थंडी अधिक तीव्र हाेती. केवळ २०१६ व २०२० मध्ये १० तारखेपासूनच त्याची जाणीव झाली. या काळात दिवसाचे तापमान अधिक व रात्रीचे तापमान कमी असते. मात्र, ऑक्टाेबरप्रमाणे उन्हाचा त्रास या महिन्यात हाेत नाही. पहिल्या १० दिवसांनंतर दिवसाचाही पारा घसरत जातो. या महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता असते व सरासरी १६ मि.मी. हाेते. मात्र, १९४६ साली नाेव्हेंबरमध्ये तब्बल १६२.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती.

याच वर्षी २० तारखेला २४ तासांत ८१.५ मि.मी. पाऊस झाला हाेता. यावेळी तशी शक्यता दिसून येत नाही. सरासरी कमाल तापमान ३०.९ अंश, तर रात्रीचे तापमान १५.८ अंश असते. ७ नाेव्हेंबर १९७७ साली सर्वाधिक ३५.६ अंश कमाल तापमान, तर १९१२ साली ३० नाेव्हेंबरला पारा ६.७ अंशापर्यंत घसरला हाेता. २०१२ पासून दशकभरात २०१६ साली सर्वांत कमी ९.८ अंश किमान तापमानाची नाेंद १० नाेव्हेंबरला झाली. काही वर्षांत ते १० ते ११ अंशांपर्यंत पाेहोचले आहे.

दशकभरात नाेव्हेंबरमध्ये सर्वांत कमी तापमान

वर्ष - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१

किमान पारा - १०.२ - ११.१ - ११.१ - १४.४ - ९.८ - १०.४ - ११ - १४.२ - ११.५ - १२.४

तारीख - १७ - २१ - १९ - २१ - १० - २६ - २७ - २६ - १० - २८

टॅग्स :weatherहवामानWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी