‘माझ्या सोबत गाडीवर चल’ म्हणून केला युवतीचा विनयभंग
By दयानंद पाईकराव | Updated: January 13, 2024 16:41 IST2024-01-13T16:41:05+5:302024-01-13T16:41:08+5:30
युवतीने नकार देऊन मोबाईल परत मागितला असता आरोपीने तिला अश्लील शिविगाळ करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

‘माझ्या सोबत गाडीवर चल’ म्हणून केला युवतीचा विनयभंग
नागपूर : युवतीचा मोबाईल घेऊन ‘माझ्या सोबत गाडीवर चल’ असे म्हणत एका २३ वर्षीय युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
अनिकेत जितेंद्र मेश्राम (वय २३, रा. रिपब्लिकननगर, इंदोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अनिकेत आणि पिडीत २३ वर्षीय युवती बारावीपर्यंत एकत्र शिकत होते. बारावीनंतर युवतीने फार्मसीला प्रवेश घेतला. खुप दिवस दोघांचा काहीच संपर्क नव्हता. परंतु अनिकेत तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. बुधवारी १० जानेवारीला सायंकाळी ५ वाजता युवती जयप्रकाशनगर येथील मेट्रो स्टेशनवर पायऱ्यावरून जात होती. आरोपी अनिकेतने तिचा पाठलाग करून तिच्या खिशातील मोबाईल काढून घेतला.
त्यानंतर ‘तुझ्या सोबत बोलायचे आहे, तु माझ्या सोबत गाडीवर चल’ असे म्हटले. युवतीने नकार देऊन मोबाईल परत मागितला असता आरोपीने तिला अश्लील शिविगाळ करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव ठाण्याचे उपनिरीक्षक संदिप शिंदे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, २९४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
..........