नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 09:47 PM2022-05-30T21:47:33+5:302022-05-30T21:48:01+5:30

Nagpur News सूर्यपुत्र शनिदेवाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी शनिदेवाचा तेलाने अभिषेक केला.

In Nagpur, devotees performed the anointing of Suryaputra Shanideva | नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक

नागपुरात भाविकांनी केला सूर्यपुत्र शनिदेवाचा अभिषेक

Next
ठळक मुद्देशनी मंदिरात भाविकांची गर्दी


नागपूर : सूर्यपुत्र शनिदेवाच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी शनिदेवाचा तेलाने अभिषेक केला. पहाटे ४ वाजता मंदिराचे पट उघडण्यात आले. त्यानंतर भगवान शनिदेवाचा श्रृंगार करण्यात आला. सकाळी ८ वाजता महाआरती करण्यात आली. दुपारी १२ वाजता शनिदेवाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी शनी जयंतीनिमित्त सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ७.१२ ते रात्री ११.३९ पर्यंत राहिला. अभिजीत मुहूर्त दिवसा ११.५१ वाजेपासून दुपारी १२.४६ वाजेपर्यंत राहिला.

 

Web Title: In Nagpur, devotees performed the anointing of Suryaputra Shanideva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.