शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले.. गोपीच्या संघर्षाने सावरणार होते मुलांचे भविष्य

By जितेंद्र ढवळे | Updated: March 2, 2026 13:45 IST

Nagpur : आईच्या मायेची आस... क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. आज त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत प्रश्नच प्रश्न आहेत. आईच्या हातचा घास, तिचा मायेचा स्पर्श आणि आधार देणारा हात सगळे काही एका क्षणात नाहीसे झाले.

जितेंद्र ढवळे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आईच्या मायेची आस... क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. आज त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत प्रश्नच प्रश्न आहेत. आईच्या हातचा घास, तिचा मायेचा स्पर्श आणि आधार देणारा हात सगळे काही एका क्षणात नाहीसे झाले. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले तिचे पाऊल अखेर तिच्याच आयुष्याचे शेवटचे ठरले आणि दोन चिमुकल्यांना आयुष्यभरासाठी आईच्या मायेची आस लावून गेले. गोपीच्या मुलांना कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत लढा देऊ अशी भूमिका कमल हिने 'लोकमत'कडे मांडली.

राऊळगाव येथील एसबीएल कंपनीमधील भीषण दुर्घटनेत गोपी किशोर कोते या कष्टकरी आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन निष्पाप लेकरांच्या आयुष्यावर कायमची पोकळी निर्माण झाली आहे. घरातील वाद, आर्थिक संकट आणि अस्थिर वातावरण यांना सामोरे जात गोपी यांनी मुलांच्या भविष्यासाठी धाडसी निर्णय घेतला होता. १२ वर्षाचा मुलगा हिमांशू आणि ८ वर्षाची मुलगी दीक्षा यांना उच्च शिक्षण द्यायचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे हा तिचा ठाम निर्धार होता. 

यासाठी तिने तांदूळवाणी हे गाव सोडून काटोल शहरात भाड्याने छोटी खोली घेतली. संसाराचा गाडा एकटीने ओढत ती नोकरीच्या शोधात होती आणि अखेर कंपनीत कामाला लागली. कंपनीच्या पगारावरच घरखर्च, शाळेची फी, पुस्तके, वह्या आणि भविष्यासाठीची बचत सुरू होती. पहाटे उठून कामाची धावपळ, मुलांची काळजी आणि दिवसभराचा कष्टाचा प्रवास. हेच तिचे आयुष्य झाले होते. तिच्या चेहऱ्यावर थकवा असला, तरी डोळ्यांत मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने चमकत होती. मात्र, नियतीला हे स्वप्न मान्य नव्हते. चार दिवसांपूर्वीच याच कंपनीत काम करणारी तिची चुलत बहीण कमल श्रीरामे हिला गोपीने माझा या कंपनीतला शेवटचा महिना असल्याचे सांगितले होते. कंपनीतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या वागणुकीतून तिने ही भूमिका मांडल्याचे कमल हिने सांगितले. मात्र, गोपीचे वाक्य खरे ठरले. नियतीने आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बेजबाबदार वृत्तीने तिचा जीव गेला.

सकाळी कामावर गेलेल्या गोपी यांना काय ठाऊक, तो दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा ठरेल? अचानक झालेल्या भीषण स्फोटात ती गंभीर जखमी झाली आणि उपचारांपूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's love lost, children orphaned; Gopi's struggle ends tragically.

Web Summary : A tragic accident at SBL company claimed Gopi's life, leaving her two children orphaned. She strived for their education, facing hardship alone. Her sister-in-law vows to fight for compensation.
टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोटMaharashtraमहाराष्ट्र