शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपुरातील कचरा संकलनात सुधारणा करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 22:15 IST

अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकचरा विलगीकरणात अडचणी : लेखाजोखा सादर करावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनात सुधारणा व्हावी. या हेतूने महापालिकेने दोन कंपन्यांवर कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या कामाबाबत नागरिक समाधानी नाहीत. अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल या दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कंपन्यांनाही अधिक सजगतेने काम करावे लागत आहे. ए.जी. एनव्हायरो या कंपनीला झोन क्र. १ ते ५ व बीव्हीजी या कंपनीला झोन क्र. ६ ते १० अशा प्रत्येकी पाच झोनची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पहिल्या पाचपैकी तीन झोनमधील अनेक वस्त्यात कचरा संकलनाबाबत तक्रारी आहेत. हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या तीन झोनमधील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता केली जाते. परंतु अंतर्गत भागात आजही कचरा संकलनाच्या तक्रारी आहेत. या झोनमधील तक्रारींपेक्षा बीव्हीजी कंपनीबद्दलच्या तक्रारी अधिक आहेत. आसीनगर झोनमध्ये अनेक शिष्टमंडळांनी कंपनीविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. महापौर व आयुक्तांपर्यंत या तक्रारी गेल्या आहेत. हीच स्थिती सतरंजीपुरा, लकडगंज व मंगळवारी झोनबद्दलही आहे. वर्दळीचा परिसर चकाचक करण्यात येतो. दर्शनीभाग अधिक काळ नजरेसमोर असतो, अशा भागांवर अधिक लक्ष दिले जात आहे. तुलनेत झोपडपट्ट्या व दाटीवाटीच्या भागातील कचरा रोज संकलित करण्यात येत नाही, अशा तक्रारी आहेत. शिवाय, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न या भागातील नागरिकांचा आहे. दोन दिवस कचरा साठविल्यानंतर तिसऱ्या दिवशी कचरा उचलणारी वाहने येतात, अशा बाबीही समोर येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या सर्व बाबींची माहिती घेतल्याचे कळते. कंपनीला आतापर्यंत सात लाखांवर दंडही ठोठावण्यात आला आहे.विलग संकलनाची व्यवस्था नाहीनागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात आले आहे. परंतु याला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे कचरा संकलन करणाऱ्या अनेक गाड्यात एकत्रच कचरा संकलित केला जातो. घरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा दिला जात नाही. दुसरीकडे नागरिकांकडून देण्यात येणारा कचरा तसाच गाडीत टाकण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्येही एकत्रित कचरा साठविला जातो.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न