शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

  महामेट्रोच्या मॉडेलची अंमलबजावणी करा - सचिव मनोज जोशी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 30, 2023 21:39 IST

महामेट्रोने प्रकल्पाच्या सुरुवातीपासून नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू अंतर्गत टीओडी पॉलिसी आणि अतिरिक्त स्टॅम्प ड्युटीकरिता प्रयत्न केले.

नागपूर : महामेट्रोने प्रकल्पाच्या सुरुवातीपासून नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू अंतर्गत टीओडी पॉलिसी आणि अतिरिक्त स्टॅम्प ड्युटीकरिता प्रयत्न केले. त्याचा फायदा होत आहे. महामेट्रोच्या या मॉडेलची इतर मेट्रोने अंमलबजावणी करावी, असे आवाहन केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाचे सचिव मनोज जोशी यांनी केले. नवी दिल्लीमध्ये १६ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत ‘नागरी वाहतूक व्यवस्थेत मल्टी मोडल इंटिग्रेशन संबंधी आवाहने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मनोज जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. 

मेट्रो प्रवाशांना उपयुक्त सेवा देण्याकरिता फर्स्ट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी देणे आवश्यक आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले. प्रकल्पाचे नियोजन होत असतानाच त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. दूरगामी लाभांचा विचार करता पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता एकच संस्था असणे आवश्यक आहे. आगामी काळात त्या संबंधित गरजांचा विचार करीत नियोजन होणे अपेक्षित असल्याचे असल्याचे हर्डीकर म्हणाले.

नॉन फेअर बॉक्स मॉडेलचा इतर मेट्रोलादेखील फायदा होणार असल्याचे मत महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी व्यक्त केले. महामेट्रोला सुरुवातीला मोठ्या आव्हानांना समोरे जावे लागले. राज्य सरकारच्या धोरणामुळे महामेट्रोला फायदा झाला. राज्य सरकारने नागपूर आणि पुणे मेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्रदान केला आहे. त्याद्वारे स्टॅम्प ड्युटी, डेव्हलपमेंट फंड आदींद्वारे महसूल मिळण्यास मदत होत आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर