गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:34 IST2018-07-18T22:33:58+5:302018-07-18T22:34:41+5:30
दलित, गरीब विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करावी आणि शाळेच्या फीच्या नावावर दरवर्षी निकाल रोखणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी दि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दलित, गरीब विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करावी आणि शाळेच्या फीच्या नावावर दरवर्षी निकाल रोखणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी दि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे अडविला. त्यानंतर मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. मोर्चातील शिष्टमंडळाने ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री महोदयांनी निवेदनातील मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व यशवंत तेलंग, वीरेंद्र दहिकर, थॉमस वाकोडे, अमोल सरदार, अजिंक्य मोटघरे, राजेंद्र कांबळे आदींनी केले.
भ्रष्टाचारामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,अनुसूचित जातीसाठी अर्थसंकल्पात ४५३१ कोटींची तरतूद करावी,विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या दोषींना अटक करावी आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.