थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:39+5:302020-11-28T04:04:39+5:30

\Sनागपूर : च्यवन-फिट (शुगर फ्री व्यवनप्राश) डायबिटीजच्या रुग्णाकरिता तसेच कॅलरी प्रति जागृत लोकांकरिता एक उत्तम टॉनिक आहे. श्री बैद्यनाथ ...

Immunity boosters on cold days | थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढविणारे

थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढविणारे

\Sनागपूर : च्यवन-फिट (शुगर फ्री व्यवनप्राश) डायबिटीजच्या रुग्णाकरिता तसेच कॅलरी प्रति जागृत लोकांकरिता एक उत्तम टॉनिक आहे. श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन ही पहिली आयुर्वेदिक कंपनी असून डायबिटीजच्या रुग्णांकरिता त्यांच्या आवश्यतेनुसार शर्करारहित अर्थात शुगर फ्री च्यवपप्राशची निर्मिती केली आहे. यात नैसर्गिक रूपात व्हिटॅमिन ‘सी’ असलेला आवळा आहे. त्यामुळे शरीराच्या विभिन्न अवयवांना आवश्यक घटकांची पूर्तता होऊन शरीराच्या सिस्टिमला शक्ती मिळून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. मौल्यवान जडीबुटी, वंशलोचन शतावरी, अश्वगंधा, विदारीकंद आणि दशमूल यांचे यात मिश्रण असल्याने शरीराला शक्ती आणि स्फूर्ती प्रदान करते. च्यवन-फिटच्या सेवनाने अशक्तपणा, अत्याधिक तहान लागणे, अंगदुखी, डोळ्यापुढे अंधारी येणे यासारख्या तक्रारी दूर होतात. श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवनने बाजारात डायबिटीज रुग्णांकरिता मधुमेहारी ग्रॅन्युल्स जेवणाच्या १५ मिनिटांपूर्वी सकाळ-सायंकाळ, करेला जामून ज्यूस २०-५० मिली सकाळ-सायंकाळ, आयुष क्वाथ चूर्ण २ कप पाण्यात ३ ग्रॅम उकळून १ कप शिल्लक राहील तो काढा घ्यावा, तसेच अणू तेल दोन थेंब दोन्ही नासिकांत सकाळ-सायंकाळ, अश्वगंधादी चूर्ण एक चमचा दुधासोबत दिवसातून दोनवेळा, च्यवन-फिट दोन चमचे सकाळ व सायंकाळी किंवा चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. (वा.प्र.)

Web Title: Immunity boosters on cold days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.