शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मैं हिट हू, और फिट भी! नागपूरची गोल्डन लेडी हेलन जोजफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 10:18 IST

‘मेरी उम्रपर मत जाओ, मैं हिट भी हू और फिट भी.’ हेलन जोजफ असे त्यांचे नाव.

ठळक मुद्देप्रेरणादायी आत्मविश्वास६३ वर्षीय गोल्डन लेडीची सातासमुद्रापार धाव

मंगेश व्यवहारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हरणाची चपळता, वाघिणीचे बळ, मर्दानीसारखी शरीरयष्टी. आॅर्डनन्स फॅक्टरीच्या मैदानावर पहाटे तिला वाऱ्यासारखी धावताना बघून प्रत्येकालाच आश्चर्य वाटते. तिला जेव्हा वय विचारतात, तेव्हा सर्वच अवाक् होतात. होय, ही विशेषणे जिच्यासाठी आहेत त्या ६३ वर्षीय महिलेचा उत्साह, जोश तरुणींनाही लाजवेल असाच आहे. त्यामुळे आॅर्डनन्स फॅक्टरीत त्या गोल्डन लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत.आपल्या खेळाडूवृत्तीचा अभिमान असल्याचे सांगत त्या म्हणतात, ‘मेरी उम्रपर मत जाओ, मैं हिट भी हू और फिट भी.’ हेलन जोजफ असे त्यांचे नाव. आजकाल चाळीशीनंतरच महिला नाना प्रकारच्या आजाराला बळी पडतात. त्यामुळे त्यांचे शारीरिकच नव्हे तर मानसिक खच्चीकरण होते. याला हेलन जोजफ अपवाद आहेत. ६३ वर्षाच्या हेलन यांना कुठलाच आजार नाही. खडगाव रोड, वाडी येथे राहणाऱ्या जोजफ यांना दोन मुले, सुना व नातवंडं आहेत. आॅक्टोबरमध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतरही बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या मास्टर्स अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत त्या सहभागी झाल्या. शालेय जीवनापासूनच त्यांना खेळाची आवड होती.आई आणि वडीलसुद्धा उत्कृष्ट खेळाडू होते. पती फुटबॉल खेळाडू होते. १९६८ पासून त्या सातत्याने मैदानाशी जुळल्या आहेत. त्यांना आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी होती. आॅर्डनन्स फॅक्टरीच्या होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत त्यांनी कधीच सुवर्ण पदक सोडले नाही.त्यामुळे त्यांना गोल्डन लेडीचा मान मिळाला. निवृत्तीनंतरही त्यांनी हे बिरुद कायम ठेवले आहे. आजही पहाटे ५.३० वाजता त्या मैदानावर असतात. नियमित सराव करतात. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींना त्या प्रशिक्षण देतात. जपान, चायना, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर येथे झालेल्या मास्टर्स अ‍ॅथ्लेटिक्स एशियन चॅम्पियनशिपमध्ये हायजम्प, ट्रिपल जम्प, १०० मिटर रनिंग, गोळाफेकमध्ये सुवर्णपदके पटकाविली आहेत. स्पेन येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड मीट’साठी त्यांची निवड झाली आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस