आय एम हिज फॅन नंबर १!
By Admin | Updated: May 1, 2015 02:25 IST2015-05-01T02:25:17+5:302015-05-01T02:25:17+5:30
हातात काँग्रेसचा मोठा झेंडा, पंजाबी धाटणीचा तिरंगी पेहराव, डोक्यावर पगडी, अनवाणी पाय अन् डोळ्यात प्रतीक्षा केवळ राहुल गांधी यांची एका झलक मिळावी याची.

आय एम हिज फॅन नंबर १!
योगेश पांडे नागपूर
हातात काँग्रेसचा मोठा झेंडा, पंजाबी धाटणीचा तिरंगी पेहराव, डोक्यावर पगडी, अनवाणी पाय अन् डोळ्यात प्रतीक्षा केवळ राहुल गांधी यांची एका झलक मिळावी याची. अ.भा.काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी नागपूरमार्गे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पदयात्रेला गेले. यावेळी रविभवन येथे ते मुक्कामी असताना पहाटे ४ वाजताच्या सुमारास एक तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
दिनेश शर्मा देसी असे या तरुणाचे नाव असून जेथे जेथे राहुल गांधी यांचे काही कार्यक्रम असतात, तेथे हरयाणा येथील रहिवासी असलेला दिनेश कशाचीही पर्वा न करता मिळेल त्या साधनाने पोहोचतो. राहुल गांधी मेरे लिए सबकुछ है...उनके लिए मै किसी भी हालात में कही भी जा सकता हूं...आय एम हिज ‘डायहार्ट फॅन’ हे त्याचे बोल त्याच्या सच्चेपणाची साक्ष देत होते.
राहुल दिल से सच्चे है
राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित आहे. सामान्य जनतेबाबत त्यांच्या मनात कळवळा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त आपुलकी वाटते. ते मनाने फार खरे आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच मी सर्व ठिकाणी पोहोचतो. ते मला ओळखतातदेखील. ज्या वेळी ते हसून चौकशी करतात तेव्हा मनाला फार समाधान मिळते. राहुल गांधी हिरो, बाकी सब झिरो हे माझे आवडते वाक्य आहे, असे दिनेशने यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राहुल यांच्या सर्व कार्यक्रमांना दिनेश अनवाणी पायाने पोहोचतो. त्याच्या पायाला गोटे व काचा लागून जखमा झाल्या होत्या तरी मी त्यांचा आदर करतो.