प्रभाग रचनेचे चित्र ७ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट

By Admin | Updated: August 22, 2016 02:34 IST2016-08-22T02:34:38+5:302016-08-22T02:34:38+5:30

नागपूरसह राज्यातील नऊ महापालिकांच्या बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग

The illustration of the ward structure is as clear as September 7 | प्रभाग रचनेचे चित्र ७ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट

प्रभाग रचनेचे चित्र ७ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट

मनपाच्या हातीच कारभार : राजकीय हालचाली वाढणार

नागपूर : नागपूरसह राज्यातील नऊ महापालिकांच्या बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना केली आहे. याचा अर्थ कोणत्या प्रभागाची रचना कशी असेल हे महापालिकाच निश्चित करणार आहे. नवीन प्रभाग रचना अस्तित्वात येणार असल्याने महापालिकेतील राजकीय हालचाली वाढणार आहे.
नागपूरसह राज्यातील नऊ महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी- मार्च २०१७ मध्ये होणार आहे. बृहन्मुंबई वगळता सर्व महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय (चार सदस्यीय) प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करावी लागणार असल्याने त्यासंबंधीचे काम सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. या प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव आरक्षणासह ७ सप्टेंबरपर्यंत द्यावयाचा आहे.निवडणुकीसाठी प्रभागरचना प्रारूप तयार करताना अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी आरक्षित प्रभागांचा समावेश करावा आणि त्याची तपासणी करून प्रस्ताव १२ सप्टेंबरपर्यत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची मुदत महापालिकांना देण्यात आली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेला २३ सप्टेंबरपर्यत निवडणूक आयोगाकडून मान्यता दिली जाणार आहे. प्रभाग रचनेसोबतच महापालिकेत आरक्षित असलेल्या इतर मागासवर्ग, तसेच महिलांच्या जागांसाठी ७ आॅक्टोबर रोजी आरक्षित सोडत काढण्याची आयोगाची सूचना आहे.

Web Title: The illustration of the ward structure is as clear as September 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.