नागपुरात व्याधिग्रस्त वृद्धेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 19:48 IST2020-02-24T19:45:08+5:302020-02-24T19:48:10+5:30

आजाराने त्रस्त झालेल्या एका वृद्धेने विष प्राशन करून व्याधीतून आपली कायमची सुटका करून घेतली.

Illness old age woman committed suicide in Nagpur | नागपुरात व्याधिग्रस्त वृद्धेने केली आत्महत्या

नागपुरात व्याधिग्रस्त वृद्धेने केली आत्महत्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आजाराने त्रस्त झालेल्या एका वृद्धेने विष प्राशन करून व्याधीतून आपली कायमची सुटका करून घेतली. कुसुमबाई गंगाधर पाटील (वय ६२) असे मृत वृद्धेचे नाव आहे. त्या नाईक तलाव बंगलादेश परिसरात राहत होत्या.
कुसुमबाईला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची बायपासही झाली होती. वृद्धावस्थेत अन्य आजारानेही घेरल्याने कुसुमबाई त्रस्त झाल्या होत्या. शनिवारी २२ फेब्रुवारीला दुपारी ४ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. ते लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी आधी खासगी इस्पितळात दाखल केले तर तेथून मेडिकलमध्ये नेले. उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी रात्री ७ च्या सुमारास मृत्यू झाला. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Illness old age woman committed suicide in Nagpur