देशी दारूची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST2021-04-16T04:07:58+5:302021-04-16T04:07:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : पाेलिसांनी दाेन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या तिघांना ...

देशी दारूची अवैध वाहतूक
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : पाेलिसांनी दाेन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पिकअप वाहन, दारूसाठा असा एकूण ४ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.१५) दुपारी करण्यात आली.
रितिक हिरामण लाेखंडे (२२, रा. लेंडीपुरा, काेंढाळी), रितिक राजेश खंडाळे (२०, रा. साठेनगर, काटाेल) व संजय पंढरी मडावी (३९, रा. बाजारगाव) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. काेंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना काटाेलहून देशी दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी वर्धा राेड टी-पाॅइंट येथे नाकाबंदी सुरू केली हाेती. दरम्यान काेंढाळी-वर्धा मार्गावर सायखेडा परिसरात एमएच-४९ डी-६९०८ क्रमांकाचे पिकअप वाहन जाताना आढळून आले. ते वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात नऊ पेटी देशी दारूसाठा आढळून आला. सदर वाहनातील आराेपी रितिक लाेखंडे व रितिक खंडाळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूून ५१,८४० रुपये किमतीची देशी दारू व ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ४ लाख १,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर काेंढाळी पाेलीस पथकाने बाजारगाव येथील झाेपडपट्टी येथे धाड टाकून माेहफुलाच्या गावठी दारूची विक्री करणारा आराेपी संजय मडावी यास रंगेहात अटक केली. त्याच्याकडून १० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. या दाेन्ही कारवाईत दारूसाठा व वाहन असा एकूण ४ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.