शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नागपुरात खासगी बसेसच्या अवैध ‘पार्किंग’ला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:31 IST

उपराजधानीतील विविध भागांमध्ये खासगी बसेसचे अवैधपणे ‘पार्किंग’ करण्यात येते. अनेकदा यामुळे तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते व अपघातांचा धोकादेखील असतो. खासगी बसेसची समस्या वाढत असताना त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रमाण मात्र सातत्याने घटत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली. आकडेवारीकडे नजर टाकली असता खासगी बसेसच्या अवैध ‘पार्किंग’ला अभय देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देवाहतूक विभागाची कारवाई घटली : दुचाकींवरील कारवाईत मात्र वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील विविध भागांमध्ये खासगी बसेसचे अवैधपणे ‘पार्किंग’ करण्यात येते. अनेकदा यामुळे तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते व अपघातांचा धोकादेखील असतो. खासगी बसेसची समस्या वाढत असताना त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रमाण मात्र सातत्याने घटत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली. आकडेवारीकडे नजर टाकली असता खासगी बसेसच्या अवैध ‘पार्किंग’ला अभय देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत अवैध ‘पार्किंग’संदर्भात किती कारवाई करण्यात आली, स्थानिक किंवा बाहेरगावी जाणाऱ्या बसेसवर किती कारवाई झाली व यापासून नेमका किती महसूल प्राप्त झाला, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. सहायक पोलीस आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत अवैध ‘पार्किंग’साठी ६ हजार ६७५ बसेसवर कारवाई झाली. त्यांच्याकडून तडजोड शुल्कापोटी ११ लाख ३० हजार ९२४ रुपये वसूल करण्यात आले. सरासरी एका बसकडून केवळ १६९ रुपये वसूल झाले.आश्चर्याची बाब म्हणजे दरवर्षी कारवाईचा आकडा कमी होत गेला. २०१५ मध्ये २ हजार ७५७ बसेसवर कारवाई झाली. २०१६ मध्ये हे प्रमाण ३८ टक्क्यांनी घटले व १ हजार ७०० बसेसवर कारवाई झाली. २०१७ मध्ये २०१६ च्या तुलनेत आणखी २०.७१ टक्के प्रमाण घटले व १ हजार ३४८ बसेसवर कारवाई झाली.दुचाकींवरील कारवाईतून ४९ लाखांचा महसूलदरम्यान, या कालावधीत अवैध ‘पार्किंग’ केल्याबद्दल शहरातील ३२ हजार २३५ दुचाकी वाहनांवर ‘पिक-अप व्हॅन’च्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. २०१५ मध्ये कारवाईचे प्रमाण २ हजार ९०९ होते. २०१६ मध्ये हा आकडा १२ हजार ३३८ वर पोहोचला तर २०१८ च्या अवघ्या सहा महिन्यांत ९ हजार ६२७ वाहनांवर कारवाई झाली. साडेतीन वर्षांच्या कालावधीत या वाहनचालकांकडून ४९ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. तसेच वाहतूक विभागाला अडीच वर्षात विविध माध्यमातून एकूण ५८ कोटी ३२ लाख २८ हजार ८५६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.‘स्पीड ब्रेकर’मुळे झालेल्या अपघातांची माहिती नाहीनगापूर शहरात ‘स्पीड ब्रेकर’चे नेमके काय निमय आहेत, याची माहिती वाहतूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ‘स्पीडब्रेकर’मुळे नेमके किती अपघात झाले याची माहितीदेखील वाहतूक विभागाकडे उपलब्ध नाही ही आश्चर्याची बाब आहे.

 

टॅग्स :Parkingपार्किंगnagpurनागपूर