कामठी : पाेलिसांनी जनावरांच्या मांसाची अवैध विक्री करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई गुरुवारी (दि. ७) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कामठी शहरातील भाजीमंडी परिसरात करण्यात आली.
मोहम्मद उस्मान मोहम्मद सुभान (३२, रा. जुनी खलाशी लाईन, बकरा कमेला, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ताे भाजीमंडी परिसरात जनावरांचे मांस विकत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी पाहणी करून त्याला ताब्यात घेतले. ताे विकत असलेले मांस गुरांचे असल्याचे स्पष्ट हाेताच त्याला अटक केली. त्याच्याकडून एकूण १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.