अवैध दारू वाहतूकदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:22+5:302021-04-13T04:08:22+5:30
कळमेश्वर/गाेंडखैरी : कळमेश्वर पाेलिसांच्या पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटरसायकल ...

अवैध दारू वाहतूकदार अटकेत
कळमेश्वर/गाेंडखैरी : कळमेश्वर पाेलिसांच्या पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटरसायकल व दारूसाठा असा एकूण ४ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ११) सकाळी करण्यात आली.
भाेजेश प्रवीण शंभरकर, रा. कमाल चाैक, नागपूर, सतीश गजानन पाल, रा. टेका नाका, नागपूर, शानू मनाेज वैद्य, रा. बिनाकी मंगळवारी, नागपूर व याेगेश धनराज फलके, रा. इंदिरानगर झाेपडपट्टी, ब्राम्हणी, कळमेश्वर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊनमुळे कळमेश्वर पाेलिसांनी गस्त वाढविली आहे. पाेलिसांचे पथक गाेंडखैरी परिसरात गस्तीवर असताना त्यांना या भागातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी हिंगणा टी पाॅईंटजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यावेळी नागपूरच्या दिशेने जात असलेली एमएच-३१/एन-८९३७ क्रमांकाची कार पाेलिसांनी थांबवून झडती घेतली. त्यांना या कारमध्ये १५० लिटर माेहफुलाची दारू आढळून आली. तसेच ही दारूची वाहतूक अवैध असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच दारूसह कार जप्त केली. यात पाेलिसांनी भाेजेश शंभरकरला अटक केली आणि त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पाेलिसांनी सतीश पाल याला ताब्यात घेत त्याच्याकडून चार हजार रुपयांची २० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. पुढे याच पथकाने शानू वैद्य याच्याकडून तीन हजार रुपयांची १५ लिटर, तर याेगेश फलके याच्याकडून माेटरसायकल व दारू असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक मनाेज खडसे, सहायक फाैजदार दिलीप सपाटे, ईश्वर धुर्वे, पाेलीस हवालदार प्रकाश उईके, गणेश मुदमाळी, नीलेश उईके, गणेश ढेंगे यांच्या पथकाने केली.