अवैध दारू वाहतूकदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:01+5:302020-12-25T04:08:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील रानवाडी शिवारात कारवाई करीत माेटरसायकलने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक ...

अवैध दारू वाहतूकदार अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील रानवाडी शिवारात कारवाई करीत माेटरसायकलने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून माेटरसायकल आणि दारूच्या बाटल्या असा एकूण ३२ हजार ३९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई गुरुवारी (दि. २४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
योगेश्वर नामदेव जुगसेनिया (३७) व गोविंदा भीमराव बन्सोड (३३) दाेघेही रा. रानवाडी, ता. नरखेड अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. रानवाडी शिवारातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या शिवाराची पाहणी केली. त्यांना एमएच-४०/एडी-६६२१ क्रमांकाच्या माेटरसायकलने दाेघे येत असल्याचे दिसताच त्यांनी दाेघांनाही थांबवून विचारपूस केली. त्यांनी सुरुवातीला असंबद्ध उत्तरे दिली.
पाेलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील पिशवीत पाेेलिसांना देशीदारूच्या४६ बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताचपाेलिसांनी दाेघांनाही ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांची माेटरसायकल आणि २,३९२ रुपयांची दारू असा एकूण ३२ हजार ३९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस नाईक कुणाल आरगुडे, चेतन राठाेड, समाधान बिथसे यांच्या पथकाने केली.