अवैध दारू विक्रेत्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:23+5:302021-05-27T04:08:23+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना लाॅकडाऊनमुळे दारू विक्री बंद असतानाच ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. ...

Illegal liquor dealer arrested | अवैध दारू विक्रेत्यास अटक

अवैध दारू विक्रेत्यास अटक

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : काेराेना लाॅकडाऊनमुळे दारू विक्री बंद असतानाच ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. दरम्यान, कुही पाेलिसांनी लाेहारा येथे कारवाई करीत अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका आराेपीस अटक केली. त्याच्याकडून ३,८४० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. ही कारवाई साेमवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

नथ्थू अंतुजा मेश्राम, रा. लाेहारा, ता. कुही असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. लाेहारा परिसरात अवैधरीत्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी लाेहारा येथे आराेपीच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता, लाेखंडी पलंगाच्या खाली देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पाेलिसांनी आराेपीस ताब्यात घेत त्याच्याकडील ३,८४० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात भागवत गुट्टे, अमाेल झाडे, कृष्णा घुटके यांच्या पथकाने केली.

Web Title: Illegal liquor dealer arrested