अवैध दारू विक्रेत्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST2021-05-26T04:09:32+5:302021-05-26T04:09:32+5:30

कन्हान : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वराडा येथे कारवाई करीत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या एका आराेपीला अटक केली असून, त्याच्याकडून ...

Illegal liquor dealer arrested | अवैध दारू विक्रेत्यास अटक

अवैध दारू विक्रेत्यास अटक

कन्हान : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वराडा येथे कारवाई करीत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या एका आराेपीला अटक केली असून, त्याच्याकडून ७० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि.२४) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सुनील अजबराव देवुलकर (३४, रा.शंकरनगर, कन्हान) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. वराडा येथे दुचाकीच्या डिक्कीमधून देशी दारूची अवैध विक्री केली जात असल्याची माहिती कन्हान पाेलिसांना मिळाली. त्या आधारे पाेलिसांनी सापळा रचून घटनास्थळी धाड टाकली असता, आराेपी हा आपल्या एमएच-४०/बीएस-०५८० क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीतून देशी दारूची विक्री करताना आढळून आला. पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेत, त्याच्याकडून ६०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १० बाटल्या व ७० हजारांची दुचाकी असा एकूण ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Illegal liquor dealer arrested