मोदींचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: October 12, 2014 01:17 IST2014-10-12T01:17:21+5:302014-10-12T01:17:21+5:30
देशापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. पाकिस्तानने देशाच्या सीमेवर अघोषित युद्ध सुरू केले आहे, असे असताना देशाचे पंतप्रधान विदेशवारीत मश्गूल आहे. आता तर महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

मोदींचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
काँग्रेस नेत्यांची टीका : पूर्व नागपुरात जाहीरसभा
नागपूर : देशापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. पाकिस्तानने देशाच्या सीमेवर अघोषित युद्ध सुरू केले आहे, असे असताना देशाचे पंतप्रधान विदेशवारीत मश्गूल आहे. आता तर महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
एक दोन नव्हे तर २५ सभा घेऊन मोदींचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. देशाचे पंतप्रधान या नात्याने देशाच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वाचे असताना, ते केवळ महाराष्ट्राच्या निवडणुकीवर फोकस करीत असल्याचे आश्चर्य माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी हसनबाग येथील जाहीर सभेत व्यक्त केले. पूर्व नागपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ हसनबाग येथे जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला हाजी शेख हुसेन, विशाल मुत्तेमवार, अॅड. अभिजित वंजारी, रोशन अंसारी, सलिम बच्चा, राजीक खान, इकलाक अंसारी, नौशाद अली, शफीभाई, युनूस कुरेशी, सुभानभाई, युसुफभाई, हमीदभाई, राजूभाई चुडीवाले, शेखभाई, मो. हनीफ बिडीवाले, मेहबुल्लाभाई, कैलास रामटेके, झिया-उल-हक, बाबुभाई पतंगवाले, मिलिंद शेंडे, हनीफभाई भूरू, कयुमभाई गादीवाले, सैयद हुसेन, जब्बारभाई, चाँदभाई प्याजवाले, पप्पूभाई, अन्वरभाई थैलीवाले, तुगलक अंसारी, यासीन अंसारी, सलिम अंसारी, मकबुलभाई अंसारी, हिमायतभाई बॅगवाले, आरीफ चुडीवाले उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना वंजारी म्हणाले की, हसनबागेतील नागरिकांना मालकीपट्टे देणार आहोत. शिक्षणावर जोर देत हसनबागमध्ये शैक्षणकि संस्था स्थापन करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)